Raj Thackeray News : 'पुण्येश्वर' आणि 'नारायणेश्वर' मुद्द्याकडे आता राज ठाकरे लक्ष घालणार?

Punyeshwar and Narayaneshwar Temples : पुणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी इतिहास संशोधक मंडळाला भेट देत, ऐतिहासिक ठेव्याची पाहणी केली.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर आता वाराणसीतील 'ज्ञानवापी' मशिदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्ञानवापी मशिदीचे नुकतेच 'आर्कल एज्युकल सर्वे ऑफ इंडिया' कडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून महत्वपूर्ण गोष्टी उजेडात आल्याचं जाणकार सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील पुण्येश्वरआणि नारायणेश्वर मंदिराचा प्रश्न चर्चेत आला आहे. एवढच नाही तर या प्रकरणाकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लक्ष देणार असल्याचंही मनसेकडून सांगण्यात येत आहे.

शनिवारी पुणे दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली आणि ऐतिहासिक ठेव्याची पाहणी केली. यानंतर पुणे शहरातील मनसे नेते अजय शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे अवशेष त्यांना दाखवले. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी पुण्येश्वर मंदिरामधील काही अवशेष आणि महादेवाची पिंड दाखवली, सोबत त्या ठिकाणी कशाप्रकारे अनधिकृत मशिद बांधण्यात आली आहे याची माहितीही दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Raj Thackeray News : राज यांनी दिलेला शब्द पाळला, इतिहास संशोधक मंडळाला लाखोंची देणगी अन् 'ही' भेट

याबाबत माहिती देताना अजय शिंदेंनी, 'पुणे शहरात ऐतिहासिक पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं होती. पण आता त्या ठिकाणी दर्ग्याचे अतिक्रमण झाले असून ते हटवण्यात यावं अशी आमची मागणी आहे. या दोन्ही मंदिरांच्या जागी उत्खनन करण्यात यावे त्यातून सत्य परिस्थिती निश्चितच समोर येईल. याबाबत वारंवार आम्ही सरकारकडे मागणी केली आहे.' असे सांगितले.

याशिवाय 'पुणे शहराची ओळख असलेल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्याची मागणी, गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अनेक दस्तावेज आणि ऐतिहासिक कागदपत्रातून मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्याचं स्पष्ट होत आहे. तरीदेखील आजपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.' असंही शिंदे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Nikhil Wagle : हल्ल्याच्या घटनेला वागळेच कारणीभूत; पुणे पोलिसांचा दावा

मंदिरासाठी मोठं जनआंदोलन -

तर 'आम्ही मागील काही कालावधीपासून राज्य सरकारकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याउलट आम्ही केलेल्या वक्तव्यांवरून आमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आमचा हा लढा असाच सुरू राहणार आहे. भविष्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरासाठी मोठं जनआंदोलन उभारणार आहोत.' असंही शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com