पिंपरी-चिंचवडमधील दहा टक्के नागरिकांनी अजूनही घेतला नाही लसीचा पहिला डोस..

भारतात सर्वाधिक ओमीक्रॉनचे (Omicron Variant) दहा रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आढळले आहेत.
Covid-19 vacciation

Covid-19 vacciation

Sarkarnama

Published on
Updated on

पिंपरी : यावर्षी जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid-19 vacciation) देशभर सुरु झाले. त्यात ११ महिन्यानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) दहा टक्के व्यक्तींना अद्यापही लसीचा पहिला डोस देण्यात आलेला नाही. तर, ३६ टक्के नागरिक हे दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. पिंपरी महापालिकेनेच (PCMC) सोमवारी (ता.१३ डिसेंबर) दिलेल्या आकडीवारीतून ही बाब समोर आली आहे.

<div class="paragraphs"><p>Covid-19 vacciation</p></div>
राज ठाकरेंकडून पक्षात 'स्वच्छता' मोहिम; पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट बहूतांश नियंत्रणात आली आहे. मात्र, नुकत्याच कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या उत्परिवर्तीत विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. आफ्रिका आणि युरोपात, तर त्याने कहर केला आहे. भारतात सर्वाधिक म्हणजे दहा रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. ते सतर्क झाले आहे. तिसरी लाट व ओमीक्रॉनयांचा सामना करण्यासाठी लसीकरणावर भर देऊन ते पूर्ण करण्याची नितांत गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे ११ महिन्यानंतरही १० टक्के लसीचे पात्र लाभार्थी हे पहिल्या, तर ३६ टक्के हे दुसऱ्या डोसपासून अद्याप वंचित आहेत. शहरातील १८ वर्षावरील १७ लाख ६६ हजार सहाशे लसीकरणासाठी पात्र नागरिकांपैकी १५ लाख ९३ हजार ३६ जणांना (९० टक्के) पहिला डोस मिळाला आहे. तर, ११ लाख ३१ हजार दोनशे वीस जणांना (६४ टक्के) दुसरा डोस देण्यात आलेला आहे. म्हणजे शहरात २७ लाख ९६ हजार चारशे नऊ लसीच्या मात्रा टोचण्यात आल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Covid-19 vacciation</p></div>
मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांना चिरडणं पूर्वनियोजितच! एसआयटीच्या तपासात बाब उघड

पहिला डोस घेण्यात वा दिलेल्यात तरुणाई (१८ ते ४४ वयोगट) आघाडीवर आहेत. या घटकाचे लसीकरणाचे प्रमाण तब्बल १०४ टक्के आहे. याच वयोगटाला दुसरा डोस मिळाल्याचा टक्का ६८ एवढाच आहे. तो पहिल्या डोसपेक्षा खूपच कमी आहे. तरीही तीन वयोगटात दुसरा डोस मिळण्यात तेच आघाडीवर आहेत. ज्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे अशा ज्येष्ठांच्या (साठ वर्षे व त्यापुढील) पहिल्या मात्रेची टक्केवारी सर्वात कमी ६३ आहे. दुसरा डोस मिळालेल्यांतही याच वयोगटातील प्रमाण सर्वात कमी म्हणजे ५६ टक्के आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे कोरोनाच्या दृष्टीने डेंजर झोनमध्ये असलेल्या याच वयोगटातील सिनीअर सिटीझनसाठी कोरोना योद्ध्यानंतर हे लसीकरण प्रथम सुरु करण्यात आले होते. नंतर ते ४५ ते ५९ या वयोगटासाठी सुरु केले गेले. तर, शेवटच्या व तिसऱ्या टप्यात १८ ते ४४ म्हणजे तरुणाईचा त्यात समावेश करण्यात आला. मात्र, शेवटी सुरु होऊनही लसीकरणात तरुण वर्गच आघाडीवर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com