Narayan Rane vs Uddhav Thackeray : ठाकरे गट मातोश्रीपुरताच मर्यादीत; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Rane Visit Bapat Family : बापट कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Girish Bapat News : भाजप नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी (ता. २९) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर सर्वपत्रक्षीय नेत्यांनी बापटांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच बापट कुटंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बापट यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, "बापट १९९५ साली आमदार म्हणून सभागृहात आले, तेव्हा मी स्वतः शिवसेनेचा आमदार होतो. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती. बापट यांना विधिमंडळाच्या कामात रस होता. गिरीशभाऊ गेल्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ते गेल्यामुळे भाजपचे नुकसान झाले. भाऊ यांना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला होता, त्यावेळी मला नातू झाला होता. तेव्हा खूप वाईट वाटत होते."

Narayan Rane
Maharashtra's Leader: एकनाथ शिंदेंसह, महाराष्ट्रातील या नेत्यांनाही मिळालीय 'डी लिट' पदवी

सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दोन गटात राडा झाला आहे. या प्रकरणावर मात्र मंत्री राणे यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले, "या प्रकरणात मी काही बोलणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्याकडे लक्ष आहे. ते हे प्रकरण सांभाळतील."

यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फक्त मातोश्रीचेच मुख्यमंत्री होते अशी टीका केली. राणे म्हणाले, "ठाकरे गट मातोश्रीपुरताच मर्यादीत आहे. आता ठाकरे उरले नाही. ते संपले आहेत. ठाकरे यांच्याकडे फक्त मातोश्री राहिली आहे. ते अडीच वर्षे मातोश्रीचेच मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे नाही."

Narayan Rane
BJP On Sharad Pawar : उद्धव ठाकरे- राहुल गांधी यांच्यात मध्यस्थी? : भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल

पंढरपूर येथील सभेत मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी गर्दीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. सावंत म्हणाले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली." यावर मंत्री राणे म्हणाले की, सावंत मुंबईत आणि मी दिल्लीत आहे. तसेच सावंत असे काही असे भाष्य माझ्याकडे काढत नाहीत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com