Maharashtra's Leader: एकनाथ शिंदेंसह, महाराष्ट्रातील या नेत्यांनाही मिळालीय 'डी लिट' पदवी

These Leaders Received D Litt Degree : या नेत्यांनाही मिळाली आहे 'डी लिट' पदवी
Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt Degree
Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt DegreeSarkarnama

These Leader Received D Litt Degree: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले आहे. शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकिय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी बहाल केली आहे.  त्यामुळे आता शिंदे यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागणार आहे. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच राजकीय नेते नाहीत ज्यांना ही पदवी मिळाली आहे. शिंदे यांच्या आधी अनेक राजकीय नेत्यांना या पदवीने गौरविण्यात आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील काही महत्वाच्या नेत्यांना विद्यापीठांनी ही पदवी दिली आहे.

Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt Degree
Karnataka assembly election : ''कर्नाटकमध्ये भाजपला 60 जागा सुद्धा मिळणार नाहीत''

डी. लिट पदवी म्हणजे काय?

राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. एखाद्या कर्तृत्वान व्यक्तीला डी. लिट. पदवी द्यावी, असा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ठेवला जातो. बैठकीत त्यावर चर्चा होऊन तो, राज्यपालांच्या मान्यतेसाठी तो प्रस्ताव पाठविला जातो. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ‘डी. लिट.’ पदवी प्रदान करण्यात येते.

Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt Degree
Ajit Pawar News : राज्यातील सरकार लोकांच्या मनातून उतरले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना नोव्हेंबर 2022 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने डी. लिट पदवीने सन्मानित केले होते. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ही पदवी शरद पवार यांना देण्यात आली. याआधी सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डी. लिट पदवी सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली होती. 

याआधी डी. वाय पाटील विद्यापीठाने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ही पदवी दिली होती. मनोहर जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात राजकीय क्षेत्रात जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली होती.

दरम्यान, भारती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठांनीही शरद पवार यांना डी. लिट पदवी दिली आहे. याच वर्षातील फेब्रुवारी महिन्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना ही डी. लिट पदवीने सन्मानित केले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com