Maharashtra Politics : ठाकरेंचे शिलेदार ओमराजे-कैलास पाटलांची जोडी, पुण्यात बांधणार धाराशिवकरांची मोट

2024 Elections : ...तरीही, पुण्यातूनच ओमराजे आणि कैलास पाटील निवडणुकीच्या कामाला लागण्याची चिन्हे आहेत.
Omraje - Kailas Patil
Omraje - Kailas PatilSarkarnama
Published on
Updated on

सचिन वाघमारे

Omraje and Kailas Patil : दिल्लीतील ‘महाशक्ती’च्या धाकाने ठाकरेंचे एका झटक्यात, ४० आमदार फुटले, १२ खासदार फुटले. ठाकरेंकडे उरल्यासुरल्या १६ आमदार आणि ६ खासदारांनाही गळाला लावण्याच्या उद्देशाने फासे टाकले गेले, पण धाराशिवचे नेतृत्व करणारे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव-कळंबमधून ठाकरेंना भक्कम साथ देणारे आमदार कैलास पाटील काही कोणाच्या जाळ्यात अडकले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Omraje - Kailas Patil
Modi in Shirdi : महाराष्ट्रात आले आहात, तर जरांगे पाटलांची भेट घ्या; उद्धव ठाकरे PM मोदींना थेट बोलले

उलटपक्षी या दोघांनी 'महाशक्ती' रूपी भाजपला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटेल तशा भाषेत आव्हान देत राहिले. हेच ओमराजे आणि कैलास पाटील पुण्यातून प्रचाराची तुतारी फुंकणार आहेत. अर्थात, ते पुण्यातून लढणार नाहीत. तरीही पुण्यातूनच ओमराजे आणि कैलास पाटील निवडणुकीच्या कामाला लागण्याची चिन्हे आहेत.

थोडक्यात काय; तर आगामी निवडणुकीचा बारीक विचार करून या दोघांच्या पुढाकारातून आता मराठवाड्यातील विशेषतः धाराशिवमधील नागरिकांचा मेळावा भरवणार आहेत. त्यामध्ये ओमराजे कैलास पाटील भाषणे करून मराठवाड्यातील मात्र, मूळच्या धाराशिवकरांची मोट बांधणार असल्याचे स्पष्ट आहे.

धाराशिव फाउंडेशनच्या वतीने पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या धाराशिवकरांसाठी गावाकडच्या मातीशी जोडणारा हा सोहळा रविवारी ( दि. २९ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता, थोपटे लॉन्स, रहाटणी येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच या निमित्ताने धाराशिवची लेक सुप्रसिद्ध युवा भारुडकार कृष्णाई उळेकर हिचं गाजलेलं "बुरगुंडा भारुड" ही पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Omraje - Kailas Patil
Thackeray Group News : भाजपला मोठा धक्का; एकनाथ पवारांचा ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना दिलं हे वचन

धाराशिव जिल्ह्याच्या बाहेर राहून कर्तृत्वाच्या, कष्टाच्या जोरावर आपल्या भूमिपुत्रांनी प्रेरणादायी यश मिळवले आहे. त्यांच्या कार्याची ओळख एकमेकांना व्हावी आणि धाराशिवकरांचा अभिमान द्विगुणीत व्हावा, हाच या स्नेहमेळाव्याचा उद्देश असल्याचे, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास (दादा) घाडगे पाटील यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com