Uddhav Thackeray and Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षाने दावा केलेल्या 'त्या' पाच विधानसभेच्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेला हव्यात!

Mahavikas Aghadi and Assembly Elections : विधानसभेसाठी मतदारसंघांवर दावे केले जात असल्याने, महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत.
Uddhav Thackeray and Sharad Pawar
Uddhav Thackeray and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Assembly Constituency and Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच विधानसभेचे पडघम आता वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह असून विधानसभा निवडणुकीत देखील आपणच बाजी मारू असा विश्वास आहे.

त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते आग्रही असून विविध जागांवरती आपला दावा सादर करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडून आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) पक्षाकडून सहा विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर ,पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला यांच्यासह शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा समावेश आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटकडून देखील कोथरुड,पर्वती,हडपसर वडगाव शेरी, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघांवरती दावा करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray and Sharad Pawar
Pune Politics : आता माजी नगरसेवकांना आमदार व्हायचंय! पुण्यात चुरस वाढणार; काय आहे कारण?

याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईमध्ये पुण्यातील विधानसभानिहाय पदाधिकाऱ्याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, रवींद्र मिर्लेकर हे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी विधानसभानिहाय अहवाल यावेळी सादर केला. अहवालाच्या माध्यमातून आमची कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकद आहे. तसेच महाविकास आघाडी मध्ये ह्या जागा आपल्याला मिळाल्यास त्या कशा जिंकून आणू शकतो याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन काही जागांची आम्ही मागणी केली असल्याची माहिती मोरे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

Uddhav Thackeray and Sharad Pawar
Video Uddhav Thackeray : मला भाजपसोबत जायचं आहे, पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'प्लॅन'

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी कोथरूड, हडपसर वडगाव शेरी, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या पाच जागांची मागणी आम्ही केली आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ताकदीवर ती जागा महाविकास आघाडीला मिळाल्याने या जागेसाठी देखील शिवसेना ठाकरे गट आग्रही असणारा असल्याचे सांगत एकूण 6 जागांची मागणी आमची आल्याचे मोरे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक, सध्याची त्या विधानसभा मतदारसंघांमधील असलेली शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि यापूर्वी शिवसेनेचा आमदार त्या जागेवर निवडून आला असल्याच्या बेसिसवर जागांची मागणी आम्ही केली असल्याचं मोरे म्हणाले.

मागील दोन विधानसभा निवडणुकीत मध्ये महायुती मध्ये असताना पुण्यातील एकही जागा आम्ही लढली नव्हती. मात्र आता पुण्यातील शिवसेनेची ताकद या निवडणुकीमध्ये दाखवून देण्याची आम्हाला संधी आहे. त्यामुळेच ज्या जागांवरती आमची जास्त ताकद आहे त्याच जागांची मागणी आम्ही केली असल्याचं मोर यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com