PCMC Railway Station Bhumi Pujan: पिंपरीतील रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी मोदींच्या हस्ते

Narendra Modi News : पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर आता रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचे भुमीपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऑनलाईन
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने 'अमृत भारत स्टेशन' योजना हाती घेतली आहे. त्यात समाविष्ट पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) आकुर्डी, तर मावळातील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणावर सत्तर कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कामाचे भूमिपूजन येत्या रविवारी (ता.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाईन करणार आहेत.

पुणे (Pune) दौऱ्यावर नुकत्याच (ता.१) येऊन गेलेल्या मोदींनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाच्या दुसऱ्या टप्यांचे उद्घाटन ऑनलाईन केले होते. त्यानंतर आता ते मध्य रेल्वेवरील दोन स्थानकांच्या कायापालट करण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी ऑनलाईनच करणार आहेत. या दोन रेल्वे स्थानकांसह चिंचवड आणि देहूरोड या इतर दोन स्थानकांचे सुशोभीकरण याच योजनेच्या दुसऱ्या टप्यात केले जाणार आहे.

Narendra Modi News
Monsoon Session News : शहांनी विरोधकांना ठणकावले : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत गोंधळ

या चार स्थानकांचा अमृत योजनेत समावेश करण्यासाठी आपणच पाठपुरावा केला होता, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी सांगितले. सुभोभीकरणासह या स्थानकांचा विस्तारही केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तळेगाव दाभाडे आणि आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी अनुक्रमे ४० कोटी ३५ लाख आणि ३३ कोटी ८ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यातून रेल्वे स्टेशनवर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी सोयीसुविधा, लिफ्ट, मोफत वाय-फाय, वाहनतळ होणार आहे.

Narendra Modi News
Swabhimani Shetkari Sanghatana Dispute : राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी'तील वाद आणखी चिघळणार?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ता.१ जुलै) पुणे दौऱ्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे (waste to energy project) ऑनलाईन उद्घाटन केले होते. त्यामुळे गेली ३३ वर्षे दुर्गंधीचा सामना करणाऱ्या मोशीकरांनी आनंदोत्सव केला होता. आता त्यानंतर पुन्हा मोदी पिंपरीतील रेल्वे स्टेशनच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन करणार आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com