Murlidhar Mohol- Jagdish Mulik
Murlidhar Mohol- Jagdish Muliksarkarnama

ब्राह्मण महासंघाच्या मागणीने मोहोळ-मुळीकांच्या पोटात गोळा !

मोहोळ (Murlidhar Mohol) हे पुण्याचे माजी महापौर आहेत तर मुळीक (Jagdish Mulik) विद्यमान शहराध्यक्ष आहेत.
Published on

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांना पुण्यातून खासदारकीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. महासंघाची मागणी प्रत्यक्षात आल्यास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) या इच्छुकांची खासदारकीची संधी हुकणार आहे.

Murlidhar Mohol- Jagdish Mulik
पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत तर मुळीक विद्यमान शहराध्यक्ष आहेत. या दोघांच्या मनात पुण्याच्या खासदारकीची इच्छा आहे. या दोघांच्या नावाची चर्चादेखील गेल्या वर्षभरापासून होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यातून खासदारकी लढणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आज ब्राम्हण महासंघाने भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे फडणवीस यांना पुण्यातून खासदारकीची उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणी केली आहे.

Murlidhar Mohol- Jagdish Mulik
शिंदे-फडणवीसांना भेगडे भेटले अन् `PMRDA`च्या आयुक्तांची झाली बदली

ब्राम्हण महासंघाच्या मागणीने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक २०१४ ते २०१९ या काळात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे कोथरूडमधून गेली अनेक वर्षे नगरसेवक असलेले मुरलीधर मोहोळ हेदेखील खासदारकीसाठी इच्छुक आहेत. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना सुरुवातीला स्थायी समितीचे अध्यक्ष आणि त्यानंतर महापौरपदाची संधी मिळाली. सलग अडीच वर्ष ते पुण्याचे महापौर होते.

Murlidhar Mohol- Jagdish Mulik
नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यावेळच्या कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी विद्यमान आमदारांची चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मधून अचानक उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याचे भूमिका मांडण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात त्यावेळी देखील प्रदेश समितीकडून मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी कोथरूडमधील उमेदवारीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उभा करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ किंवा मेधा कुलकर्णी या दोघांचाही पत्ता या मतदारसंघातून कट झाला.

मोहोळ यांची महापौरपदाची मुदत मार्चमध्ये संपली. गेल्या वर्षभरापासून पुण्यातून लोकसभा लोकसभेसाठी लोकसभेचे उमेदवार म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ व शहराध्यक्ष जगदीश मुळीक या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा होती. त्यातही मोहोळ यांचे नाव आघाडीवर होते. ब्राह्मण महासंघाने आज केलेल्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांची खरोखरच पुण्यातून उमेदवारी निश्चित झाली तर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांची खासदार होण्याची संधी किमान यावेळी तरी हुकली असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com