पुण्याचा विकास भाजपामुळे खोळंबला

भाजपा म्हणजे भारतीय ज्योतिष पक्ष झाला आहे.
 महाविकास आघाडी
महाविकास आघाडीसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमध्ये असताना भामा आसखेड, समान पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, विमानतळ यासह अनेक प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच प्रकल्पांना गती मिळाली आहे. आगामी काळात आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असा दावा महाविकास आघाडीच्यावतीने आज करण्यात आला.

 महाविकास आघाडी
मी पाटील; कुणाला घाबरणार नाही : चंद्रकांतदादा

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्‍याम देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २६ हजार कोटीचा रिंग रोड तयार केला जाणार आहे, त्याचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. यासह अनेक कामे या सरकारने केली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भाजपाने भडकावल्याने त्यांनी आत्महत्या केल्या.

 महाविकास आघाडी
महाआघाडीच्या ‘सेलिब्रेशन’ला कॉंग्रेसचे बागवे फिरकलेच नाहीत

देशपांडे म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी सरकार एकत्रित प्रयत्नांमधून काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समाजकारणाचा वसा उद्धव चालवत आहेत. सकारात्मक, कृतीवर भर देणारे सरकार आहे.’’

‘‘महाविकास आघाडी सरकार पडणार असे रोज भाजपाचे नेते सांगत आहेत. हा भाजपा म्हणजे भारतीय ज्योतिष पक्ष झाला आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्णकाळ टिकेल. उलट भाजपने कोरोना काळात लसीकरणासह इतर गोष्टीत पक्षपाती राजकारण केले आहे, असा आरोप काकडे यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com