Anna Bansode, Ashwini Jagtap, Sunil Shelke, Mahesh Landge
Anna Bansode, Ashwini Jagtap, Sunil Shelke, Mahesh LandgeSarkarnama

New Survey Vidhansabha : कुणी कितीही दावा करू द्या, पिंपरी-चिंचवडमध्ये 'याच' आमदारांचे वर्चस्व; काय सांगतो नवा सर्व्हे ?

Pimpri, Chinchwad, Maval And Bhosari : मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद सारखीच
Published on

Survey of Vidhansabha Constituency : राज्यात सध्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी बैठका, दौरे, मेळाव्यांचा सपाटा सर्वच राजकीय पक्षांनी लावला आहे. तर आगामी निवडणुकीत आपल्याच पक्षाला जास्त जागा मिळतील, असा दावा प्रत्येक राजकीय पक्षांकडून केला जात आहे. असे असतानाच आता राज्यात 'न्यूज एरेना इंडिया' या संस्थेचा सर्व्हे समोर आला आहे. (Latest Marathi News)

Anna Bansode, Ashwini Jagtap, Sunil Shelke, Mahesh Landge
Ashish Deshmukh BJPमध्ये येऊन काय साधणार ? । Devendra Fadanvis। BJP vidarbha । Sarkarnama video

'न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचा सर्वे केला आहे. आता जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर जनता कुणाला कौल देणार, हे या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आहे. या सर्व्हेत मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभेत कुणाला बळ मिळणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जास्तीत जागा आपल्याला मिळतील, असा दावा केला जात आहे. या सर्व्हेतून मात्र पिंपरी, चिंचवड, मावळ आणि भोसरीबाबत काही वेगळेच चित्र समोर येत आहे.

या मतदारसंघापैकी मावळ, पिंपरी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर चिंचवड व भोसरीत भाजपचे आमदार आहेत. दरम्यान, चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत बंड झाले नसते तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असता असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात होता. असे असले तरी नव्या सर्व्हेत चित्र मात्र काही वेगळेच दिसून येत आहे.

Anna Bansode, Ashwini Jagtap, Sunil Shelke, Mahesh Landge
Uddhav Thackeray Speech.. : तेव्हा 'इस्लाम खतरे में' आरोळ्या मग हिंदुत्ववादी कोण? भाजप की काँग्रेस?; ठाकरेंचा सवाल!

'न्यूज एरेना इंडिया'च्या सर्व्हेत आता निवडणुका झाल्या तर मावळ व पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार निवडून येतील असे स्पष्ट झाले आहे. तर चिंचवड आणि भोसरीतून भाजपलाच कौल मिळणार असल्याचा सांगण्यात आले आहे. त्यामुळे या चारही विधानसभा मतदारसंघात माहविकास आघाडी वा महायुती अशी मोठी ताकद लावली तरी स्थिती मात्र जैसे थे च राहणार असल्याचे या सर्व्हेतून सांगण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com