Muslim Reservation And Assembly Elections : आरक्षणाचं भिजतं घोगंड, सत्तेत डावलले; मुस्लिम समाज आता विधानसभा गाजवणार

Muslim Community Preparing for Assembly Elections For Reservation : आरक्षणाचा तिढा सुटताना दिसत नाही. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक मुस्लिम समाजाला डावलले गेले. मुस्लिम समाज यावर नाराज असून विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे इर्शाद सय्यद यांनी सांगितले.
Muslim Society And Assembly Elections
Muslim Society And Assembly ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Muslim Reservation News : राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मुस्लिम समाजाने देखील आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची फसवणूक होताना दिसत आहे, तशीच मुस्लिम आरक्षणाबाबत होत आहे.

"महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक मुस्लिम समाजाला डावलले. मुस्लिम समाज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असून, याचा वचपा विधानसभा निवडणुकीत जरूर घेऊ", असा इशारा समस्त मुस्लिम जमातचे प्रदेशाध्यक्ष इर्शाद सय्यद यांनी दिला.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे. ओबीसींचे आरक्षण (Maratha Reservation) वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरलेत. याशिवाय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ देखील ओबीसी आरक्षण बचावाच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावत आहेत.

धनगर समाज देखील आरक्षण लागू करण्याच्या भूमिकेवर आक्रमक दिसतो. यातून राज्यात अस्वस्थता वाढलीय. आता मुस्लिम नेते देखील न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरसावला आहे.

यातच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाला डावलण्यात आल्याचा सूर सध्या राज्यभरात आहे. त्यामुळे मुस्लिस समाज अधिकच आक्रमक झाला असून विधानसभा निवडणुकीला निर्णायक भूमिका घेणार असल्याचा इशारा इर्शाद सय्यद यांनी दिला.

Muslim Society And Assembly Elections
Manoj Jarange On Prakash Ambedkar : 'ओबीसींबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्यच! कारण मराठा...'; जरांगे नेमकं काय म्हणाले?

समस्त मुस्लिम जमातचे प्रदेशाध्यक्ष इर्शाद सय्यद म्हणाले, "आरक्षणा संदर्भात वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक झाली. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास कोणतीही अडचण व हरकत नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

तरी देखील त्याच्या अंमलबजावणीबाबत जाणिव पूर्वक वेळ काढूपणा आणि फसवणूक केली जाते". संविधानाने दिलेला मूलभूत हक्क अधिकारांची पायमल्ली होत आहे. दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून प्रस्थापित विश्वासाघात करत आहेत. अशा येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) धडा शिकवू, असे इर्शाद सय्यद यांनी म्हटले.

Muslim Society And Assembly Elections
Narayan Rane : आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद टोकाला; राणेंना झाली थेट शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले...

मुस्लिम समाजाला जाणिवपूर्वक मुख्य प्रवाह आणि सत्तेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र नेहमी होत असते. महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम समाजाच्या छातीवर स्वस्वार्थासाठी परप्रांतीय नेते थोपवले जातात.

यातूनच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या हक्काच्या जागा असतानाही समाजाला न्याय हक्कापासून प्रस्थापित राजकीय नेते दूर ठेवत आहेत. तसे षडयंत्रच रचले गेले आहे.

या प्रस्थापितांना लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुस्लिम समाज आपली ताकद दाखवले, असा इशारा इर्शाद सय्यद यांनी दिला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे, खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी, माजी खासदार इम्तियाज जलील, आझाद समाज पक्षाचे आणि भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आमदार कपिल पाटील आणि इतर समविचारी संघटनांशी चर्चा करून मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भात लवकरच तीव्र लढा उभारणार असल्याचे इर्शाद सय्यद यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com