Manoj Jarange On Prakash Ambedkar : 'ओबीसींबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्यच! कारण मराठा...'; जरांगे नेमकं काय म्हणाले?

Maratha Vs OBC reservation : ओबीसीमध्ये मराठ्यांचे हक्काचे आरक्षण आहे. त्यामुळे कोणालाही कोणताही धक्का लागत नाही
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी सुरू आहे. मात्र त्याला ओबीसी नेत्यांचा मोठा विरोध सुरू आहे. त्यातच आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षण बचावासाठी जनयात्रा काढणार असल्याचे सांगितले. आंबेकरांच्या या मताला मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सहमती दिल्याने ट्विस्ट निर्माण झाला आहे.

आंबेडकांरांच्या Prakash Ambedkar भूमिकेवर जरांगे म्हणाले, ते बरोबरच बोलले आहेत. आम्ही ओबीसीतच आहोत. मराठा समाज हाच ओबीसीत आहे. कुणबी हा पण ओबीसीत आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहे. ओबीसीमध्ये मराठ्यांचे हक्काचे आरक्षण आहे. त्यामुळे कोणालाही कोणताही धक्का लागत नाही, असे स्पष्ट मत जरांगेंनी व्यक्त करत ओबीसीच्या मागणीवर ठाम असल्याचे ठासून सांगितले.

राज्यातील गरीब मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. गरीब मराठ्यांवर श्रीमंत मराठे कुरघोडी करत असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले होते. त्यावर जारांगेंनी, आम्ही पण तेच म्हणत आहोत. ही गरिब मराठ्यांची लढाई आहे, स्पष्ट केले.

गरीब मराठ्यांचे लेकरे मोठी व्हावीत, हे 70 वर्षांत कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटले नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते, जे राजकारणात होते यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच मी गरीबांसाठी लढाई उभी केली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आंबेडकर राज्यात आता आरक्षण बचाव जनयात्रा काढणार आहेत. त्यावर छेडले असता, जरांगेंनी, त्यांनी काय काढावे आणि काय नाही काढावे, हे आम्ही कसे सांगू शकणार. मी मात्र आणि माझा गरीब मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणारच, असे आव्हानच आंबेकर आणि सरकारला दिले आहे.

Manoj Jarange
Prakash Ambedkar : आंबेडकरांचं ठरलं,ओबीसींसाठी 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार; तर मराठ्यांसाठीही देणार मोठा लढा! म्हणाले...

जरांगे Manoj Jarange सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यावर आंबेडकरांनी टीक करत ही मागणी भेसळयुक्त असल्याचे म्हटले. यावर जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मंत्र्यांनी, न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेली असून ती पक्की आणि टिकणारी आहे. त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे. ते भेसळ असेल, तर 50 टक्क्यांवर जे २ टक्के आरक्षण दिलेले आहे तेही भेसळच असणार, असा खडा सवालच जरांगेंनी आंबेकरांना केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Devendra Fadnavis : विशाळगडावरील अतिक्रमणावर देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com