पुणे शहर-जिल्ह्यात शिवसेनेची वाट बिकट !

येत्या काही दिवसात शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसेल.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) झाल्यानंतर ठाणे-मुंबईसह (Thane-Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि आता खासदारदेखील शिंदे गटात सहभागी होत आहेत. या पाश्‍र्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अनेकजणांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र, येत्या काही दिवसात यापेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यात शिवसेनेची भविष्यातील वाटचाल बिकट असल्याचे दिसत आहे.

Eknath Shinde
राजकीय अस्थिरतेमुळे ‘आयएएस’-‘आयपीएस’च्या बदल्या रखडल्या

शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शरद सोनवणे, शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे, युवासेनेचे किरण साळी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात गेल्या चार दिवसात प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसात शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची ही काही मोजकी नावे आहेत. मात्र, या पुढच्या काळात शिवसेनेतल्या शहर आणि जिल्हा पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde
राहुल शेवाळेंच्या अडचणीत वाढ; संबंधित महिलेने दिली आत्महत्येची धमकी

शिवसेनेचे पुण्यात सध्या दोन शहराध्यक्ष आहेत संजय मोरे व गजानन थरकुडे यांच्यावर अध्यक्षपदाची जबबदारी आहे. संपर्कप्रमुख म्हणून पुण्याची सर्वस्वी बाबदारी असलेले आमदार सचिन आहिर व अदित्य शिरोडकर यांच्याजवळ असलेले अनेकजण शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे.यापैकी अनेकजण येत्या काही दिवसात उघडपणे शिंदे गटाबरोबर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाकडे सुरू असलेला ओघ पाहता या पुढच्या काळात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच प्रमुख नेते शिवसेनेत उरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता जे शिवसेनेत आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल होत आहे. अनेकांनी शिंदे गटात जाण्याची मानसिक तयारी केली असली तरी प्रत्यक्ष पाऊल उचललेले नाही. येत्या काही दिवसात त्यांच्या मनाची पक्की तयारी झाल्यानंतर ते आमच्या मागे येणारच आहेत, असा विश्वास शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com