MLA Ravindra Dhangekar: फडणवीसांसाठी पुढचा काळ चांगला नसेल.. धंगेकरांना असं का म्हणाले?

MLA Ravindra Dhangekar : आमदार धंगेकरांनी निवडणूक काळातील काही घडामोडीवर भाष्य केलं आहे.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra DhangekarSarkarnama

MLA Ravindra Dhangekar: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयश्री खेचून आणत इतिहास रचला. धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला. या निकालानंतर नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनी निवडणूक काळातील काही घडामोडीवर भाष्य केलं आहे. निवडणुकीनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यानी त्यांच्या राजकीय प्रवासासह राजकारणातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

२०२४ ला पुन्हा निवडणुका लागणार आहेत. हा बालेकिल्ला राखून ठेवण्यासाठी काय करणार, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर धंगेकर म्हणाले की, ''जनता जे ठरवेल ते मला मान्य असेल, पण मी कुठेही कमी पडणार नाही. महापालिकेच्या निवडणूकीतही पैशाचा पाऊस पडला, तेव्हाही जनतेने निवडून दिलं. आताही पाऊस पडला तरीही जनतेने निवडून दिलं. हा मोठा विजय आहे.

MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekar: पैशांंचा पाऊस.. निकालानंतर धंगेकरांनी सांगितले निवडणूक काळातील 'ते' प्रसंग...

आगामी महापालिकां निवडणुकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांचं आव्हान कसं पेलणार, यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, खरंतर आतापर्यंत महापालिका निवडणुका होऊन जायला हव्या होत्या. पण हे राज्यसरकार घाबरत आहे. निवडणूक यंत्रणा हाताशी धरली आहे. मी तीस वर्षांच्या राजकारणार असा काळ कधीही पाहिला नाही. कॉंग्रेसचाही काळ पाहिला, पण त्यांनीही असं कधीच केलं नाही. विरोधकांना हाताशी धरुन त्यांनी राजकारण केलं. कार्यकर्ता जगवला. पण भाजप मात्र कार्यकर्त्याला, नेत्याला संपवण्याचंच काम करत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

फडणवीस मोठे नेते आहेत. पण त्यांचं धोरणचं वेगळं आहे. ज्या पद्धतीने ते राजकारणाचा आलेख ओढायचं काम करत आहे. ते अवघड आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, यांना समाज नमस्कार करतो. पण कार्यकर्ता म्हणून सांगतो, फडणवीसांसाठी पुढचा काळ चांगला नसेल... असं भाकितही त्यांनी वर्तवलं.

MLA Ravindra Dhangekar
Hasan Mushirff News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव, 'हे' आहे कारण

याचवेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हु इज धंगेकर या प्रश्नालाही उत्तर दिलं. चंद्रकांत दादा मोठे नेते आहेत. ते पालकमंत्री आहेत त्यांना मला बोलायचा अधिकार आहे आणि कोणाला उलटं बोलणं ही आपली संस्कृती नाही. माझ्या आईवडिलांनीही मला असं उलटं बोलायला शिकवलं नाही. राजकारणात माझ्यावर झालेली टीका मी स्वीकारली. रवी धंगेकर हे कार्डचं मोठ आहे. महाराष्ट्रात ते दिसत आहे.

तुमच्या कामाची व्याप्ती आता वाढली आहे. यापुढे आता काम कसं करणार, असा सवाल विचारल्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, तुम्ही आता माझ्या ऑफिसमध्ये जा आणि तुमचं काम सांगा. बघा दहाव्या मिनिटाला तुमचं काम होईल. कारण माझ्या यंत्रणाच तशा आहेत. आता जबाबदारीही वाढली आहे. समाजाच्याही माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी घडवावं लागेल, पण लोकांना यापेक्षाही जास्त प्रेम मी देणार. अशी ग्वाही त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com