मतदारयादीत छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार वडगाव शेरी मतदारसंघात

मतदार छायाचित्र सादर करणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार वडगाव शेरी मतदार संघातील आहेत.
Voting List
Voting ListSarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील दोन लाख ८६ हजार ८२१ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेले नाही.जे मतदार छायाचित्र सादर करणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने सांगण्यात आले. छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार वडगाव शेरी मतदार संघातील आहेत.

२१ मतदारसंघात एकुण ७८ लाख ८७ हजार ८७४ मतदार आहेत.यापैकी मतदारयादीत छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार वडगाव शेरी मतदारसंघातील ६४ हजार ७१८ मतदार आहेत. त्यापाठोपाठ कोथरूड मतदारसंघातील ४४ हजार ५२५, हडपसर मतदारसंघातील ३८ हजार ३९१, खडकवासला ३२ हजार १२३, पुणे कॅन्टोन्मेन्ट २३ हजार ६९१, शिवाजीनगर २१ हजार ९१३, पर्वती मतदारसंघात १७ हजार ६७७, पिंपरी १० हजार ४७६, कसबा ९ हजार २०४, शिरूर ७ हजार ८२१, चिंचवड ५ हजार ५९९, पुरंदर ४ हजार २६९, दौंड २ हजार ६५५, भोसरी एक हजार ७४९, इंदापूर १ हजार १७०,भोर ८३१, आंबेगाव ९ विशेष म्हणजे जुन्नर, खेड-आळंदी, बारामती व मावळ या चार मतदारसंघातील आतापर्यंत मतदार झालेल्या शंभर टक्के मतदारांनी छायाचित्रे समाविष्ट केली आहेत.

Voting List
भाजपाशी युतीची चर्चा तूर्त नको : राज ठाकरेंची भूमिका

कोथरूड विधानसभा मतदारसंघात चार लाख १3 हजार 389 मतदार असून त्यापैकी तब्बल 47 हजार 120 मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये नव्हते. त्यापैकी एकूण 2 हजार 497 लोकांचे छायाचित्र जमा करण्यात आले असून मतदारयादीत अद्ययावत करण्यात आले आहेत.सध्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून त्या अंतर्गत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचा शोध घेऊन छायाचित्र जमा करण्याचे काम करीत आहेत.

छायाचित्र जमा न करणारे तसेच या मोहिमेत आढळून न येणाऱ्या मतदारांचा पंचनामा करून तसेच फोटो जमा न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.संबंधित मतदारांना लवकरात लवकर छायाचित्र ‘बीएलओ’ किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, रेल्वे बुकिंग कार्यालयाच्या शेजारी, कर्वे रोड, कोथरूड या ठिकाणी जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर मतदारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली असून pune.gov.in/documents-category/election-en/ तसेच pmc.gov.in/mr/voter_list_no_photo यावर मतदार ही नावे शोधू शकतात.

Voting List
‘एमपीएससी’चा सुधारीत निकाल जाहीर : मानसी पाटील मुलींमध्ये राज्यात पहिल्या

त्यामध्ये काही मतदारांनी आपले नाव नोंदविताना संपूर्ण पत्ता तसेच संपर्क क्रमांक नोंदविलेला नाही त्यामुळे अशा मतदारांचा शोध घेण्यात अडचणी येत असून त्यासाठी नविन नाव नोंदणी करताना सर्व मतदारांनी आपला संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता व्यवस्थित नोंदवून आपले अर्ज www.nvsp.in या वेबसाईटवर किंवा Voter Helpline App द्वारे ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन नायब तहसीलदार ( निवडणूक शाखा ) कोथरुड विधानसभा मतदारसंघ स्वप्निल खोल्लम यांनी केले.

असे आहेत फॉर्म

फॉर्म क्रमांक 6 - नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी

फॉर्म क्रमांक 7 - मतदार मयत झाल्यास किंवा स्थलांतरित झाल्यास यादीतील नाव वगळण्यासाठी

फॉर्म क्रमांक 8 - मतदार यादीतील नाव, लिंग, फोटो, पत्ता इत्यादी तपशील दुरुस्त करण्यासाठी

फॉर्म क्रमांक 8अ - एकाच मतदार संघातील एका भागातून दुसर्‍या भागामध्ये स्थलांतर केल्यास मतदान केंद्र बदलण्यासाठी.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com