Beed APMC Election : बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहिण-भावात संघर्ष..

Market Committee : टक्केवारी, वसुली, गुटखा, दारू हे विषय प्रचारात वापरत काकांनी पुतण्याला भांडावून सोडले.
Beed APMC Election
Beed APMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : बीड जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या (ता.२८) रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर,(Jaydatta Kshirsagr) संदीप क्षीरसागर काका-पुतणे आणि पंकजा-धनंजय मुंडे या बहिण भावांमध्ये संघर्ष पहायला मिळाला. निवडणुक प्रचारात या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत मतदारांना आवाहन केले होते. आता उद्याच्या मतदानानंतर मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, कुणाची सरशी होते यावर जिल्ह्यातील पुढच्या राजकीय घडमोडी ठरणार आहेत.

Beed APMC Election
Parbhani APMC Election : नेत्यांनी ताकद लावली, उद्या ठरणार मतदारांचा कौल..

जयदत्त क्षीरसागर यांनी आपली बाजार समितीवरील सत्ता कायम राखण्यासाठी शक्तीपणाला लावली आहे. परंतु त्यांच्या या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी तब्बल पाच पक्षांना एकत्र घेत सुरू केले आहेत. प्रचारा दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ला चढवण्यात आला होता. (Dhnanjay Munde) टक्केवारी, वसुली, गुटखा, दारू हे विषय प्रचारात वापरत काकांनी पुतण्याला भांडावून सोडले.

तर जयदत्त क्षीरसागर यांनी बोगस मतदार नोंदणी केल्याचा पलटवार पुतणे संदीप यांनी केला होता. (Pankaja Munde) तर ऐन मतदानाच्या पुर्वसंध्येला आमदार संदीप क्षीरसागर, शिंदे गटाचे कुंडलिक खाडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मतदारांना धमकावल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तिकडे भगवानगडावरील कार्यक्रमानंतर मुंडे बहिण भावातील कडवटपणा कमी झाल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र पंकजा आणि धनंजय मुंडे हे राजकीय आखाड्यात मात्र एकमेकांना चीतपट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत दोघेही बिनविरोध झाल्याने बहिण-भावाच्या नात्यातील कटुता संपत आहे, असे वाटत असतांना पुन्हा दोघांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे परळी बाजार समितीमध्ये कोणत्या मुंडेचा झेंडा फडकतो, याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com