Baramati Lok Sabha Constituency: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून प्रचारप्रमुखांची नावे जाहीर!

Mahayuti Campaign Head : या यादीवरून राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते.
Mahayuti Baratmati
Mahayuti BaratmatiSarakarnama

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, हा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे.

यामध्ये बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हामध्ये कुलदीप कोंडे व मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीवरून राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahayuti Baratmati
Baramati Lok Sabha News : बारामतीत अजितदादांनी ‘अशी’ केली जुळवाजुळव; स्टेजवरून सांगितली शिलेदारांची नावं

तसेच , बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत वासुदेव काळे, प्रदीप गारटकर व किरण गुजर या तिघांचा समावेश असून, ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणार आहे. महायुती मजबूत असून, महायुतीत उत्तम समन्वय आहे हा संदेश राज्यभर या निमित्ताने या तिन्ही नेत्यांनी पोहोचविला आहे. आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागतील, अशी महायुतीची अपेक्षा आहे.

काही दिवसांपूर्वी विरोध असलेल्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यात अजित पवारांना यश आले आहे. शुक्रवारी (ता. 19) हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अजित पवार व सुनेत्रा पवार जेवणासाठी जाणार आहेत. महायुती एकसंघ असून कोणतेही मतभेद नाहीत हा संदेश या निमित्ताने नेत्यांकडून दिला जात आहे.

Mahayuti Baratmati
Ajit Pawar News : विरोधक अन् मित्र कसा असावा, हे शिवतारेंकडून शिका! अजितदादांकडून कौतुकाचा वर्षाव...

महाराष्ट्रात लोकसभेची सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे ती बारामतीची (Baramati Lok Sabha News). पवार कुटुंबातच ही लढाई होत असून, विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अजित पवारांकडून मतदारसंघात जुळवाजुळव केली जात असून, त्यात त्यांना यशही मिळाल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com