मीनाक्षी गुरव : सरकारनामा ब्यूरो
पुणे : इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने २८ ऑक्टोबरकमी ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ११ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळ किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना जोडून या सुट्या घेता येतील, असे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीची सुटी पुन्हा वाढवून मिळणार आहे. दिवाळीच्या सुट्या कमी झाल्या असल्यास दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे असणाऱ्या सुट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) झाल्यानंतर घेता येतील, असे नमूद केलेले नवीन परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या घेता येणार आहेत.
दर शैक्षणिक वर्षात शाळांना जवळपास ७६ सुट्ट्यांचे नियोजन करणे अपेक्षित असते. त्यानुसार यापूर्वी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली होती. परंतु यंदा पूर्व नियोजित राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) परीक्षा असल्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळांना १० नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, यंदा दिवाळीच्या सुट्ट्या कमी मिळत असल्याने शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सुट्ट्यांबाबत नवीन परिपत्रक काढले आहे.
‘‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सुटीचे नियोजन राज्य सरकारच्या आदेशानुसार बदलले आहे. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी सर्व शाळा सुरू होतील आणि १२ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या शाळांमधील निवडक इयत्तांमधील निवडक विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होईल. त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार सुधारित परिपत्रकामुळे याआधी रद्द झालेल्या सुट्या घेण्याचा आधिकार मुख्याध्यापकांना दिला आहे. त्यानुसार १३ किंवा १५ नोव्हेंबरपासून देखील काही शाळा सुट्टी घेऊ शकतील, असे मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.