येत्या निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत ‘महिलाराज’ ?

१७३ जागांसाठी ५८ प्रभागांची रचना होणार आहे. यातील २९ प्रभागांत दोन महिला सदस्य असणार आहेत.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवन सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : येत्या निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत १७३ नगरसेवक राहणार आहेत. यामधील ५० टक्के आरक्षणानुसार तब्बल ८७ जागा महिला नगरसेविकांसाठी राखीव राहणार आहेत. याशिवाय सर्वसाधारण गटातून महिला नगगरसेविका उभ्या राहू शकणार असल्याने येत्या निवडणुकीनंतर महापालिकेत ‘महिलाराज’ येण्याची शक्यता आहे.

महिलांसाठी असलेल्या ८७ राखीव जागांमध्ये अनुसुचित जातींसाठी १२ जागा,अनुसूचित जमातींसाठी एक जागा, ओबीसी महिलांसाठी २४ व सर्वसाधारण गटातील महिलांसाठी ५० जागा असतील. सर्वसाधारण गटातून ५१ जागा आहेत. या गटातूनही महिला उभ्या राहू शकतात. एकुण जागांचा विचार करता येत्या निवडणुकीत महापालिकेत मोठ्या संख्येने महिलांना संधी मिळून महापालिकेत ‘महिलाराज’ येऊ शकते.

पुणे महानगरपालिका भवन
पुण्यात पेट्रोल ५.८३ पैसे तर डिझल १२ रूपयांनी स्वस्त

१७३ जागांसाठी ५८ प्रभागांची रचना होणार आहे. यातील २९ प्रभागांत दोन महिला सदस्य असणार आहेत.दिवाळीनंतर काही दिवसात प्रभाग रचनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होऊ शकेल.प्रभाग रचना कशाप्रकारे होते यावर अनेक इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग रचना करताना कुणाला अनुकूल कुणाला प्रतिकूल यावर बरेच निकाल अवलंबून असतात.

पुणे महानगरपालिका भवन
इंधन दर कपातीमुळे देशभरातील पेट्रोल पंपचालकांचे १२ हजार कोटी पाण्यात

पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाजपाकून सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षभरापासून त्यादृष्टीने कामाला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात मोठी ताकद आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाीचे सरकार असल्याने पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकेतील निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने घेतला आहे.

महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याने राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेत येण्याचा स्वप्नाला मुरड घालावी लागणार आहे.पुण्याबरोबर पिंपरीतही राष्ट्रवादीला एकहाती सत्ता हवी आहे. मात्र, पिंपरीतही राष्ट्रवादीला आघाडी करावी लागणार आहे.त्यामुळे कोणताही पक्ष सत्तेत आला तरी आरक्षणाच्या नियमानुसार महिलांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असला तरी येत्या निवणुकीनंतर महापालिकेत ‘महिला राज’ येण्याची शक्यता अधिक आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com