Devdatta Nikam News : वळसे पाटलांची साथ सोडलेल्या नेत्यावर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी...

NCP Pune News : जिल्ह्यात ताकदवान अजित पवार गटाशी दोन हात करावे लागणार आहेत.
Devdatta Nikam News
Devdatta Nikam NewsSarkarnama

Pune Politics News : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडलेले मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्षपद निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. निकम यांना आंबेगावात वळसे पाटील यांच्याशी, तर जिल्ह्यात ताकदवान अजित पवार गटाशी दोन हात करावे लागणार आहेत.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. अजित पवार यांना या बंडात शरद पवार (Sharad Pawar) यांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनीही साथ दिली आहे. वळसे पाटील यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून ही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. तसेच, संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात येत आहेत. त्यातूनच एकेकाळी वळसे पाटील यांचे उजवे हात समजले जाणारे देवदत्त निकम यांच्या खांद्यावर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Devdatta Nikam News
Tamilnadu Politics : दक्षिणेत कर्नाटकनंतर भाजपला मोठा धक्का ; 'एआयएडीएमके' एनडीएतून बाहेर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात निकम यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजपर्यंत आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली ही नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आपण सर्व शक्तिनिशी योगदान द्याल, अशी अपेक्षाही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत देवदत्त निकम यांना वळसे पाटील यांनी उमेदवारी नाकारली होती. मात्र, निकम यांनी बंडखोरी करत बाजार समितीची निवडणूक लढवून विजय मिळवला होता, तेव्हापासून निकम हे वळसे पाटील यांच्यापासून दुरावले आहेत.

दुसरीकडे पक्षात आणि सरकारमध्येही कायम झुकते माप देऊनही वळसे पाटील यांनी साथ सोडल्याने शरद पवार कमालीचे दुखावले आहेत. त्या संदर्भात त्यांनी आंबेगावला कायम झुकते माप देऊनही....अशा शब्दात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. असे असले तरी आंबेगाव मतदारसंघात पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे, त्याच दृष्टिकोनातून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांना ताकद देण्यासाठी पवारांनी त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.

अजित पवार यांचा कामाचा झपाटा आणि सत्तेची ऊर्जा यामुळे ताकदवान असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाशी दोन हात करत देवदत्त निकम यांना जिल्ह्यात शरद पवार गटाची बांधणी करावी लागणार आहे, त्यामुळे ते कसोटीला किती खरे उतरतात, हे पहावे लागणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Devdatta Nikam News
Sangli NCP News: सांगली राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? अण्णा डांगे भाजपच्या वाटेवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com