Politics : धामणीकर लईच हुश्शार! सरपंचाचे वळसे पाटलांना तर उपसरपंचाचे आढळराव पाटलांना निवेदन

Politics : पुणे जिल्ह्यातील एका गावात घडला हा किस्सा
Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil
Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil Sarkarnama
Published on
Updated on

पारगाव (ता. आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ग्रामपंचायतीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. कुलस्वामी म्हाळसाकांत गावकरी विकास पॅनेलची सत्ता आली. पण विकासकामांबाबत सरपंचाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना निवेदन दिले.

तर उपसरपंचांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना निवेदन दिले. त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांनी दोन पक्षाच्या दोन नेत्यांना गावच्या विकासासाठी निवेदन दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच गावच्या विकासासाठी दोन्ही नेत्यांकडून प्रयत्न करायचे, अशी चर्चा आता रंगली असून धामणीकर लईच हुश्शार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil
Aurangabad Crime News : एसीपी ढुमेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही, बडतर्फ करा..

आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील धामणी येथे सुमारे ४५ वर्षांपासून सुरू असलेली बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा बंद होऊन ती जवळच्या शाखेत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे धामणी, शिरदाळे, पहाडदरा ग्रामस्थांची बँकिंग व्यवहाराबाबत गैरसोय होणार आहे. ती होऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन बँक बंद न होण्याबाबत प्रयत्न करावे याबाबत निवेदन दिले.

Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil
Marathwada Teacher Constituency : उमेदवार चौदा, पण चर्चा काळे, पाटील, सोळुंकेंचीच..

शेतकऱ्यांसाठी, व्यापारी तसेच व्यावसायिक लोकांसाठी अतिशय महत्वाची असलेली येथील बँक ऑफ महाराष्ट्र धामणी शाखा ही राष्ट्रीयकृत बँक म्हणून मोठ्या प्रमाणावर यात आर्थिक व्यवहार होत असतात मेंगडेवाडी पासून मांदळेवाडी अशा पंचक्रोशीतील बऱ्याच ग्राहकांना ही बँक फायद्याची ठरत आहे. पण येथील शाखा बंद करण्याची प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडून सुरु केल्याची माहिती समजल्यानंतर येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, शिरदाळे उपसरपंच मयुर सरडे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, मनोज तांबे, गणेश तांबे, मंगेश नवले, संदीप बोऱ्हाडे, अजित बोऱ्हाडे, प्रमोद वाघ, दत्तात्रय जाधव, गणेश ससाणे यांनी पारगाव येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून बँक कोठेही जाणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच परिसरातील विकासकामांबाबत वळसे पाटील यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली.

Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil
Parth Pawar : शंभूराज देसाईंना पार्थ पवार भेटले अन् चर्चांना उधाण आलं

तर उपसरपंच संतोष करंजखेले, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, माजी सरपंच सागर जाधव, अमोल गाढवे, दत्तात्रय गवंडी, ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, दिपक जाधव, नितीन जाधव, शरद जाधव, विठ्ठल गवंडी, नामदेव गवंडी किरण गाढवे, दत्ता गाढवे, हरिश्चंद्र गवंडी, दादाभाऊ गवंडी, सत्यजित जाधव, वैभव गवंडी, माधव बोऱ्हाडे, गिरीधर गाढवे, अभिषेक गाढवे यांनी लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन बँक बंद न होण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी निवेदन दिले.

Dilip Walse Patil and Shivajirao Adhalarao Patil
Kasaba Peth Election : टिळक कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया ; 'पक्षाने संधी दिली तर...'

तसेच परिसरातील विकासकामांबाबत आढळराव पाटील यांना पत्र दिले. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी बँक बंद होण्याबाबत प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अधिक माहिती देण्यास असमर्थतता दाखवत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com