Marathwada Teacher Constituency : उमेदवार चौदा, पण चर्चा काळे, पाटील, सोळुंकेंचीच..

Ncp : सोळुंके यांनी काळे यांच्याविरोधात दंड ठोकले असले तरी खरंच त्याची उपद्रव शक्ती किती आहे? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. या मतदारसंघातून एकूण १५ उमेदवारांनी अर्ज भरला होता, पैकी फक्त एकाने माघार घेतली. आता निवडणुक रिंगणात प्रत्यक्षात १४ उमेदवार असली तरी चर्चा फक्त महाविकास आघाडीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील (Kiran Patil) आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदीप सोळुंके यांचीच होत आहे.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Chandrakant Khaire : मोदींची हवा आता संपली, भाजप मुंबई कधीच जिंकू शकत नाही..

वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे निवडणुकीत रंगत वाढेल असे बोलले जात असले तरी विक्रम काळे आणि किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. (Ncp) प्रदीप सोळुंके यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठाचे आदेश असतांना अधिकृत उमेदवाराविरुद्ध केलेली बंडखोरी. (Bjp) पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असली तरी शरद पवारांच्या आदेशानेच आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगत ते संभ्रम निर्माण करत आहेत.

पवारांचा आदेश म्हणजे संधी मिळत नसेल तर ती खेचून आणावी लागते आणि मी तेच करतोय, असे ते सांगतात. राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या सोळुंकेंचे पक्षातील सर्वच नेत्यांशी चांगले संबंध होते. विक्रम काळे यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांनी उमेदवारी दाखल केली. पण माघारीच्या दिवशी ते अर्ज परत घेतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती.

परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एकदिवस अगोदर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत देवगिरी महाविद्यालयात झालेल्या पुस्तक प्रकाशनासाठी सोळुंके नेत्यांच्या शेजारी बसले होते. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी फोन बंद करून आपली उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली. त्यामुळे स्थानिक किंवा राज्य पातळीवरील नेत्यांना याची कल्पना नव्हती का? हा मोठा प्रश्न आहे.

आता सोळुंके यांनी काळे यांच्याविरोधात दंड ठोकले असले तरी खरंच त्याची उपद्रव शक्ती किती आहे? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. दुसरीकडे विक्रम काळे यांनी तीन टर्म आमदार असल्याचा अनुभव आणि याकाळात केलेल्या कामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे. तर भाजपचे किरण पाटील अद्याप फारसे चर्चेत आलेले नाहीत. भाजपने किरण पाटील यांच्यासाठी जोर लावला आहे, तर राष्ट्रवादीला चौथ्यांदा ही जागा जिंकण्याची आशा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com