Pune News : पुण्याच्या सामाजिक-राजकीय जीवनात सौहार्दाचं नातं निर्माण करणारा ‘सॅटर्डे क्लब'

Pune City News : काँग्रेसभवनमध्ये शनिवारी कट्ट्यावर भेळ आणून खात असत.
Pune News : Pune City News
Pune News : Pune City News Sarkarnama
Published on
Updated on

Pune City News : पुणे शहरात दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी विविध क्षेत्रातील विभिन्न विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चर्चा, गप्पांचा फड रंगविणारा, विविध विषयावर चर्चा करणारा ‘सॅटर्डे क्लब’ आजपासून १९ वर्षापूर्वी सुरू झाला. एक अपवाद वगळता सलग २२५ महिने हा क्लब अखंडपणे सुरू आहे. अपवाद फक्त २६/११ च्या हल्ल्याचा. या क्लबची कहाणी देखील मनोरंजक आहे. पूर्वी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसभवनमध्ये शनिवारी कट्ट्यावर भेळ आणून खात असत. यावेळी गप्पा, चर्चा असे साधारण अर्धा तास चालू असे. त्यावेळचे अनेक कार्यकर्ते आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

आणीबाणीत हा कट्टा बंद झाला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अंकुश काकडे यांनी पुढाकार घेऊन निवेदक व सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांच्या घरी काही जणांना जमण्याचे निमंत्रण दिले. अर्थात त्याची कल्पना गाडगीळ यांना देण्यात आली नव्हती. यावेळी फक्त सातजण हजर होते. त्यात धनंजय थोरात, अभय छाजेड, युवराज शहा, शांतीलाला सुरतवाला, मोहन जोशी, उल्हास पवार (Ulhas Pawar) यांचा समावेश होता. या बैठकीत असे ठरले की, दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी न चुकता एकत्र यायचे, निखळ गप्पा आणि जेवण असे स्वरूप ठरले.

Pune News : Pune City News
APMC Pune : पुणे बाजार समितीचा निकाल शनिवारी सकाळी; राष्ट्रवादीच्या पॅनलसमोर भाजपाचा टिकाव लागणार?

काळ बदलत गेला. पुण्याच्या राजकीय, सामाजिक जीवनातील मोजके शंभरजण या क्लबचे सदस्य झाले. अर्थात या क्लबमध्ये कुणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार वा सचिव असा कोणताच प्रकार नाही. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, दिवंगत गिरीश बापट यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय प्रमुख नेते कायमच सहभागी होते.

दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नियमितपणे शहरात कोणी ना कोणी क्लबचे आयोजन करू लागले. यजमान कार्यकर्त्याला त्याचे पाच मित्र बोलवण्याचे स्वातंत्र्य दिले. मात्र, त्यावेळी आलेली व्यक्ती या क्लबशी कायमची जोडली गेली. हळू हळू ही संख्या वाढत गेली. पुढे. क्लबमध्ये इतर क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घ्यावे, असा विचार पुढे आला व बहुतेक सर्वच क्षेत्रातील अनेक मंडळी सहभागी होऊ लागली.

सॅटर्डे क्लबचं आयोजन पुण्यातच झालं असं नाही तर श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीमला ४ दिवस आयोजन केले होते. जवळपास ८० जण तेथे गेले होते. प्रकाश जावडेकर मंत्री झाल्यावर त्यांनी नवी दिल्ली येथे सर्व सदस्यांना आमंत्रित केले. शरद पवार यांनी दिल्लीतच ६ जनपथ येथे अतिशय सुंदर आयोजन केले. डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठात आयोजन केले. या नेत्यांशिवाय इतर अनेकांनी यजमानपद स्वीकारले.

या विषयी बोलताना अंकुश काकडे म्हणाले, ‘‘या २२५ महिन्यात अनेक सहकारी पडद्याआड गेले, त्यांची आठवण आज होत आहे. विशेष म्हणजे क्लबला कोणीही अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार नाही. सर्व सदस्य एकाच पातळीवर असतात. काही वेळा रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते, म्हणून महिलांना आम्ही यात सहभागी करून घेऊ शकलो नाही. याबाबत शरद पवार यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे.’’

क्लबचे आणखी एक सदस्य उल्हास पवार म्हणाले, ‘‘ सुधीर गाडगीळ यांच्या घरी सुरू झालेला सॅटर्डे क्लबचा प्रवास आज २२५ महिन्यांचा झाला आहे. या काळात विविध क्षेत्रातल्या अनेकांशी संवाद झाला.राजकीय मतभेदापलिकडे जाऊन एक नवं नात निर्माण करणारा हा क्लब राज्यातल्या इतर शहरांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.’’

Pune News : Pune City News
Pune News : महाआघाडीची सत्ता जाताच सोमय्यांना धक्काबुकी करणाऱ्या शिवसेनेच्या चौघांना अटक : गुन्ह्यांची कलमेही वाढवली

२२५ व्या सॅटर्डे क्लबचे यजमान किशोर भागवत म्हणाले, ‘‘ बारा वर्षापूर्वी मी क्लबमध्ये सहभागी झालो. मी व्यवसायाने सनदी लेखापाल आहे. सुरवातीला थोडा साशंक होतो.मात्र, प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतरचा अनुभव खूप सकारात्मक होता. राजकीय भूमिका कोणतीही असो इथे सर्वजण एकत्र असतात हा अनुभव मी घेतला आहे. राजकराणाच्या पलिकडे जाणारे सौहार्दाचे वातावरण फक्त पुण्यातच असू शकते. मात्र, इतर शहरांनी याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा आहे.‘‘

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com