APMC
APMCSarkarnama

APMC Election : ...तर कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेला सदस्यही अपात्र ठरणार

Pune APMC : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया २७ मार्चपासून सुरु

Election of APMC : कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे, मात्र निवडून येणाऱ्या अशा सदस्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नियम आणि अटी दिल्या आहेत. त्यानुसार राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे विहित नमुन्यातील हमीपत्र द्वावे लागणार आहे. निवडून आल्याच्या दिनांकानंतर वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरणार आहे.

APMC
Jayant Patil on Riot : छत्रपती संभाजीनगरकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं; जयंत पाटलांचा हल्लाबोल

निवडणूक लागलेल्या बाजार समितीच्या (Market Committee) क्षेत्रात राहणारे १५ शेतकरी हे त्या बाजार समितीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृषि पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. सदर १५ शेतकऱ्यांपैकी ११ शेतकरी हे सहकारी संस्थेचा मतदारसंघ व ४ शेतकरी हे ग्रामपंचायतीचा मतदारसंघातून निवडले जाणार आहेत.

सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला प्रवर्गाकरीता २, इतर मागास प्रवर्गाकरीता १ आणि विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गाकरीता १ जागा राखीव आहे. तसेच ग्रामपंचायतीचा मतदार संघात अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती प्रवर्गाकरीता १ आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गाकरीता १ जागा राखीव आहे.

APMC
Sangali Politics : तासगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपसमोर तिसरी आघाडी उभी होणार?

APMC in Maharashtra महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम २१ (३) मधील तरतुदीनुसार राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत मिळणेबाबतची विनंती प्राधिकरणाकडे होत आहे. त्यामुळे प्राप्त अधिकारानुसार प्राधिकरणाने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सुरळीतपणे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सदर आदेश दिले आहेत, असे प्राधिकरण सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांनी कळविले आहे.

APMC
Vasant More News : पाच दिवसांपूर्वीच राज ठाकरेंसोबत कार्यक्रम अन् पुन्हा वसंत मोरे नाराज; बॅनरवरुन वादाला तोंड

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणुकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया २७ मार्च २०२३ पासून सुरु केलेल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार ३ एप्रिल २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. तसेच प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com