शेतकरी-एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ उद्या काळ्या फिती लावा

ऐन दिवाळीत राज्यातील शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांचे हाल आहेत.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलचंद्रकांत पाटील
Published on
Updated on

पुणे : ऐन दिवाळीत राज्यातील शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांचे हाल आहेत. मात्र, राज्य सरकार त्यांना मदत करायला तयार नाही.आजर्पंत राज्यातील २९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यातील जनतेने उद्या (ता.१) काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.अतिपावसाने ३८ लाख हेक्टर उभी पिके तर ११ लाख हेक्टर जमीन वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.अस्मानी संकटात राज्यातील शेतकरी सातत्याने सापडला असताना राज्य सरकार मदत करण्याच्या नावाखाली केवळ घोषणा करीत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती काही पडत नाही. ऐन दिवाळीत शेतकरी अडचणीत आहे. सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोचली नाही.

चंद्रकांत पाटील
पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने; उरले केवळ ७९२ रूग्ण

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचेदेखील शेतकऱ्यांप्रमाणे हाल होत आहेत.अनेकांना गेल्या दीड-दोन वर्षात पुरेसा आणि वेळेत पगार मिळाला नाही. ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. परिणामी एसटी कर्मचारी आत्महत्या करू लागले आहेत.एसटी कर्मचारी असो वा शेतकरी या साऱ्यांच्या या दयनीय स्थितीला राज्य सरकार जबाबदार असून याचा निषेध करण्यासाठी राज्यातील जनतेने काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील
महापौर मोहोळ म्हणाले;...तर जगतापांना किंमत मोजावी लागेल

गेल्या दोन वर्षात कधी कोकण तर कधी विदर्भ व पश्‍चिम महारष्ट्रावर नैसर्गिक संकट आले. या काळात शेतकरी व सामान्य जनतेला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. या काळात मदतीच्या घोषणा राज्य सरकारने केल्या. मात्र, प्रत्यक्षात कसलीच मदत शेतकऱ्याच्या पदरात पडली नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात काहीच न देणारे हे सरकार असल्याची टीका पाटील यांनी केली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com