PCMC Politics : फडणवीसांना सोडून अजितदादांसोबत गेलेले तुषार कामठे गडबडले अन् राष्ट्रवादीच्या शिलवंतही गोंधळल्या

Devendra Fadnavis, Ajit Pawar News : राज्यातील नवीन राजकीय समीकरणाचा माजी नगरसेवकांना फटका
Tushar Kamthe, Sulakshana Shilwant-Dhir News
Tushar Kamthe, Sulakshana Shilwant-Dhir NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : गेल्यावर्षी शिवसेना, तर यावर्षी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसही फुटली. त्यातून राज्यात नवी राजकीय समीकरणे आकारास आली. मात्र, त्यामुळे जनताच नाही, तर पहिली टर्म पूर्ण केलेले पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील काही नवखे तरुण नगरसेवकही गोंधळून गेले आहेत. यामध्ये भाजपानेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गेलेले तुषार कामठे आणि राष्ट्रवादीत असलेल्या सुलक्षणा शिलवंत-धीर यांची कोंडी झाली आहे.

त्यासाठी या दोन्ही तरुण माजी नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील नागरिकांशी संवाद साधला आहे. भविष्यात कोणता झेंडा हाती घ्यायचा याचा निर्णय आता ते आपल्या मतदारांना विचारून घेणार आहेत. तशी सुरवातही त्यांनी केली आहे.

Tushar Kamthe, Sulakshana Shilwant-Dhir News
Coal Mining Allocation Fraud : माजी खासदार विजय दर्डांना धक्का; कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात 6 जण दोषी : 18 जुलैला सुनावणार शिक्षा

राजकारण्यांची कातडी गेंड्याची असते, याला काही संवेदनशील लोकप्रतिनिधी त्यातही तरुण, मात्र अपवाद आहेत. ते हळवे आहेत. जनतेची, मतदारांची त्यांना जाण आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणामुळे ते ही गोंधळून गेले आहेत. जनतेच्या अपेक्षा आता पूर्ण कशा करणार ही भीतीही त्यांना सतावते आहे. महापालिका निवडणूक कधी होईल, हे निश्चीत नाही. तरीही ते जनतेचा कौल त्यासाठी जाणून घेत आहेत.

मागील २०१९ च्या विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) प्रथम उमेदवारी जाहीर होऊन नंतर ती रद्द झालेल्या पक्षाच्या तरुण माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धीर या सुद्धा जनतेचे मत विचारात घेऊन आपली पुढील राजकीय वाटचाल करणार आहेत. आगामी निवडणूक लढणार आहे, हे त्यांनी प्रथम स्पष्ट केले. मात्र, जनता ही सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे संतप्त झाली असून त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे, हे जाणून घेणार आहे.

Tushar Kamthe, Sulakshana Shilwant-Dhir News
Search Of Bungalow for Ajit Pawar: शासनाचे आदेश धडकले, अन् सुरू झाला अजित पवारांच्या बंगल्यासाठी जागेचा शोध !

प्रथम माझ्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन जनता तथा प्रभागातील मतदारांचे ते समजून घेण्यासाठी त्यांना मेसेज करणार आहे, असे त्या आज 'सरकारनामा' शी बोलताना म्हणाल्या. मतदार आता सजग झाला असून त्याला गृहित धरून चालणार नाही, असे सांगत मी काही मास लीडर नाही वा माझी काही स्वतंत्र अशी आयडॉलॉजीही नाही. त्यामुळे मतदारांच्या आशाअपेक्षा, मते, विचारात घेऊन राजकीय दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ ला त्या प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.

गतवेळी २०१७ ला भाजपाकडून प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले दुसरे तरुण नगरसेवक तुषार कामठे यांनी, तर शिलवंत यांच्यापेक्षा आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या मतदारांना काल एक सविस्तर मेसेजच टाकला. त्यातून ते त्यांचा कौल जाणून घेणार आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारे आणि त्यासाठी आपल्या बड्या स्थानिक नेत्यांना म्हणजे आमदारांनाही त्यांनी शिंगावर घेतले होते. त्याचा फटका त्यांना बसला.

Tushar Kamthe, Sulakshana Shilwant-Dhir News
Raj Thackeray Statement: 'मला तडजोड करावी लागली तर...' राज ठाकरेंचे मोठे विधान

कार्यक्षम असूनही पाच वर्षात त्यांना पदाधिकारी म्हणून पालिकेत संधीच देण्यात आली नाही. अखेरीस पक्षातील स्थानिक मनमानीला कंटाळून टर्म संपता संपता त्यांनी भाजपाला (BJP) रामराम ठोकला. राष्ट्रवादीत प्रवेश केला. माझ्या मनोगताच्या मेसेजवर लोकांची मते, प्रतिक्रिया काय येतात हे येत्या काही दिवसांत समजणार असून त्यानुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com