Pune Crime: बॉलिवूड अभिनेत्री अन् माजी क्रिकेटपटूच्या 'फार्महाऊस'वर चोरांनी मारला डल्ला, या गोष्टी पळवल्या

Lonavala Crime News : बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या तिकोना पेठ (ता. मावळ) येथील पवना धरणाच्या बॅक वॉटरलगत असलेल्या फार्महाऊसवर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
Sangita Bijlani.jpg
Sangita Bijlani.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या तिकोना पेठ (ता. मावळ) येथील पवना धरणाच्या बॅक वॉटरलगत असलेल्या फार्महाऊसवर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फार्महाऊसच्या मागील बाजूने प्रवेश करत ग्रील तोडून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम व टीव्ही असा सुमारे 57 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर मोहम्मद अझहरुद्दीन यांचे पी.ए. मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा (Lonawala) ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, फार्महाऊसमधून 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 7 हजार रुपये किमतीचा टीव्ही चोरीला गेला आहे.

संबंधित फार्महाऊस अभिनेत्री संगीता बिजलानी आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना क्वचितच घडतात, त्यामुळे स्थानिकांमध्येही ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली आणि संभाव्य संशयितांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. चोरीचा नेमका कालावधी आणि चोरट्यांची संख्या याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नसली तरी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Sangita Bijlani.jpg
Bhaskar Jadhav News: भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद का दिलं गेलं नाही? उद्धव ठाकरेंचा बडा नेता सगळंच खरं बोलून गेला

या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या फार्महाऊस सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, स्थानिक प्रशासनाने अशा एकट्या फार्महाऊस परिसरांत गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com