Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

Motivational story : स्वप्न भंगले म्हणून कुणीही निराश होण्याचे कारण नसल्याचा दिला सल्ला
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे एक लढाऊ राजकारणी म्हणून ओळख आहे. एका पक्षाचे नेते आणि माजी मंत्री असूनही त्यांची साधी राहणीमुळे ते प्रसिद्ध आहेत. दुष्काळी भागातून पुढे आलेला एक मुलगा ते मंत्री असा त्यांचा खडतर प्रवास आहे. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील एक किस्सा सांगितला. तो एकून उपस्थित सर्वजण अचंबित झाले होते.

Mahadev Jankar
Baramati News : 'कर्तव्यपथा'वर 'सुखोई'तून भरारी घेणाऱ्या बारामतीच्या अक्षय काकडेंनी गाजवला दिवस

पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) उपस्थित होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या होती. विद्यार्थ्यांना पाहून जानकर यांना त्यांच्या विद्यार्थीदशेतील एक किस्सा आठवला. तो त्यांनी मोकळेपणाने विद्यार्थ्यांसमोर सांगितला. त्यातून विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त करून प्रेरणाही मिळाली.

Mahadev Jankar
Kasaba By-Election : कसबा आम्ही जिंकूच; चंद्रकांतदादांचा विश्वास!

महादेव जानकर म्हणाले, "मला डॉक्टर व्हायचं होतं. बारावीच्या परीक्षेत मला ९१ टक्के पडले. त्यावेळी 'एमबीबीएस'चं (MBBS) मेरीट ९१.३ टक्के लागलं होतं. त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण नव्हतं. धनगर समाज (Dhangar) खुल्या प्रवर्गात मोडत होता. प्वॉईंट तीन टक्क्यांनी माझा 'एमबीबीएस'चा प्रवेश हुकला. खूप निराश झालो. त्यातून मनात आत्महत्येचा विचार आला होता."

जीवनात संघर्ष महात्वाचा आहे, असे सांगून जानकर पुढे म्हणाले, "आत्महत्या करायला जाताना मला शंतनुराव किर्लोस्कर (Shantanurao Kirloskar) यांचे आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे, हे एक वाक्य आठवलं. त्यानंतर मी माघारी आलो. त्यानंतर जोमाने अभ्यास करून मेरीटमधूनच इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला. त्यामुळे कमी मार्क पडले म्हणून कुणी निराश होऊ नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका."

Mahadev Jankar
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

जानकर यांच्या विद्यार्थीदशेतील हा किस्सा ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांसह उपस्थित इतरही आचंबित झाले. त्यानंतर नोकरी मिळण्यासाठी दारोदारी जाऊन भांडत बसू नका. स्वतःचा व्यावसाय उभारून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही जानकर विद्यार्थ्यांना दिला.

राजकारणही सोप्पं नसल्याचं जानकर यांनी यावेळी सांगितले. तळागाळातून आलेल्यांसाठी खासदार, आमदार होणं सोप्पं नसतं. तसेच एखादा पक्ष सांभाळणं तर त्याहूनही अवघड असल्याचं जानकर यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com