Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime News : एका महिलेने तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितली
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : एका राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी असल्याचे भासवून एका महिलेने तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या एका साथीदारावर कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन गुलाब शिंदे (रा.कोथरूड) यांची डुक्करखिंड येथे वडिलोपार्जित जागा आहे. या जागेवरील पत्राशेड अनधिकृत असल्याबाबत पूजा काळू तायड (रा.कोथरुड) यांनी महापालिकेत ऑगस्ट २०२२ मध्ये अर्ज केला होता.

Pune Crime News
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीतून कुणाला संधी? तीन आमदारांमध्ये रस्सीखेच!

हा अर्ज मागे घेण्यासाठी तसेच शेडवर कारवाई न करण्यासाठी तायड आणि त्यांचा साथीदार नीलेश शंकर वाघमारे (रा.कोथरुड) यांनी फिर्यादीकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ''तुमच्या शेडवर कारवाई करायची नसेल तर आठ लाख रुपये द्यावे लागतील. पैसे न दिल्यास जीवे मारू'', अशी धमकी फिर्यादीला दिली.

Pune Crime News
Politics : आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; भाजपच्या गोटात खळबळ

मात्र, तडजोडीअंती पाच लाख रुपयांची मागणी करीत असल्यामुळे फिर्यादीने दोन जानेवारीला याबाबत तक्रार दिली. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या तक्रारीची दखल घेत या सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी नंतर महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com