Pune APMC News : खेडला कुकरची शिट्टी वाजणार का,मावळात विमान उडणार का?

Pune Market Committee Election : खेडला कुकरची शिट्टी वाजणार का, मावळात विमान उडणार का?
Sunil Shelke, Dilip Mohite News
Sunil Shelke, Dilip Mohite NewsSarkarnama

Market Committee Election News : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) ताब्यात असलेल्या सहकारी संस्थात भक्कम पाय रोवण्याचा प्रयत्न भाजपने (BJP) आता सुरु केला आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ते हिरीरीने लढत असून त्यासाठी कट्टर शत्रू ठाकरे गट व कॉंग्रेसलाही (Congress) त्यांनी जवळ केले आहे.

२८ तारखेला होत असलेल्या या निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. बाजार समितीतील सत्ता टिकविण्यासाठी खेड व मावळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी (अनुक्रमे दिलीप मोहिते-पाटील आणि सुनील शेळके) ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर, तेथे परिवर्तन करण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी कट्टर वैरी असलेल्या ठाकरे शिवसेनेलाही हाताशी धरले आहे. तर, शिंदे शिवसेना (Shivsena) त्यांच्या बरोबरच आहे. प्रचारातील सहा दिवसांतील तीनच दिवस उरले असल्याने आमदार शेळके आणि मोहिते हे स्वत दररोज हिरीरीने प्रचार करीत आहेत.

Sunil Shelke, Dilip Mohite News
Sharad Pawar : माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला; शरद पवारांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या बाजार समिती निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यातूनच स्थानिक आजी, माजी खासदारांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, आंबेगाव, जुन्नर या बाजार समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष असून तेथून माहिती घेत असल्याचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

तर, मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मतदारसंघात मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची १२ वर्षानंतर निवडणूक होत आहे. आमदार मोहितेंच्या ताब्यातील खेड बाजार समिती हिसकावून घेण्यासाठी भाजपने कट्टर विरोधक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेबरोबर श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेल स्थापन केले आहे.

Sunil Shelke, Dilip Mohite News
Political news : भुसे, राठोड, कदमांनंतर किशोर पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी सुरुंग लावला! उमेदवारही ठरला अन्...

त्यांना प्रेशर कूकर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर, मोहिते यांच्या श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलचे कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. मावळात शेळके यांच्या बाजार समितीतील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप-शिवसेनेने महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या एका गटाला आपल्याकडे खेचले आहे. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलला कपबशी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

तर, शेळकेंच्या सहकार पॅनेलचे विमान हे चिन्ह आहे. दरम्यान, शिगेला पोचलेल्या बाजार समितीच्या प्रचारात स्थानिक राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विरोधकांच्या पॅनेलची खेडला कूकरची शिट्टी वाजणार का, तर मावळात त्यांचे विमान उडणार का अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com