Political news : भुसे, राठोड, कदमांनंतर किशोर पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंनी सुरुंग लावला! उमेदवारही ठरला अन्...

Jalgaon politics : किशोर पाटील यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.
Uddhav Thackeray, Kirosh Patil News
Uddhav Thackeray, Kirosh Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray, Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात त्यांना घेरण्यासाठी रणनीती तयार केली आहे. आता ठाकरेंनी किशोर पाटलांच्या (Kirosh Patil) मतदारसंघातही तयारी सुरु केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रविवारी जळगावमधील पाचोऱ्यात सभा झाली. शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात ही सभा झाली. दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच या मतदार संघात आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांच्या रुपाने आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात आव्हान उभे केले.

Uddhav Thackeray, Kirosh Patil News
Jalgaon Politics : ''जळगाव जिल्ह्यात गुलाबरावांच्या 'गुलाबो गँग'चा नायनाट होईल''

या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान शिवसैनिकांना केले. त्यामुळे या मतदारसंघात भावा विरोधात-बहिणीमध्येच निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे शिक्कामोर्तबच रविवारच्या सभेने झाले. वैशाली सूर्यवंशी यांच ठाकरे गटाच्या उमेदवार असतील असे संकते उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे किशोर पाटील यांना घरातच आव्हान असणार आहे. किशोर पाटील शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच ठाकरेंनीही या मतदारसंघाची जबबादारी त्यांच्यावरच सोपवली.

रविवारच्या सभेने उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आणखी एका आमदाराच्या मतदारसंघात सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जळगावमध्ये शिवसेनेची (Shivsena) मोठी ताकद आहे. जिल्ह्याने शिवसेनेला नियमीच ताकद दिली आहे. त्यामुळे हा आपला गड पुन्हा मजबूत करण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी त्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे वैशाली पाटील यांच्या रुपाने त्यांना जळगाव जिल्ह्यात पहिला उमदेवार सापडला असल्याचेही बोलले जात आहे.

Uddhav Thackeray, Kirosh Patil News
Uddhav Thackeray : बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठिशी उभा राहतो...ठाकरेंचे शिंदे-भाजपला आव्हान

सभेमध्ये ठाकरे यांनी जिल्ह्याचे पालकामंत्री आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्याच पद्धतीने आर. ओ. पाटील यांचा वारसा हा वैशाली सूर्यवंशी यांच्याकडेच असल्याचेही सांगितले. त्यामुळे पाचोऱ्याच्या राजकारणात आता भावा विरुद्ध बहिन असा सामना रंगणार आहे. आर. ओ. पाटील यांच्या कन्या असलेल्या वैशाली सूर्यवंशी यांच्या पाठीशी मतदार उभे राहतात की किशोर पाटील यांच्या पाठिंशी हे निवडणुकीत कळेच. पण या निमित्ताने ठाकरे यांनी किशोर पाटील यांची चांगलीच कोंडी केली आहे. तसेच सभेला झालेली गर्दीही किशोर पाटील यांचे टेन्शन वाढवणारीच आहे.

दरम्यान, मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात ठाकरे यांनी डॉ. अद्वय हिरे यांना पक्षात आणून भुसे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. तसेच मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात संजय देशमुख यांना पक्षात घेतले आहे. तर माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात संजय कदम यांना ठाकरे गटात आणले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील एका-एका आमदाराला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. आता किशोर पाटील यांच्यासमोरही तगडे आव्हान उभे केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com