Maval : सरकार बदललं : भेगडेंची ताकदही वाढली; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेल्या मावळच्या तहसीलदारांची थेट गडचिरोलीला बदली

Maval News : कोरोना महामारीमुळे लांबलेल्या तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला.
Sanjay bala Bhegade
Sanjay bala BhegadeSarkarnama

Pimpri-Chinchwad News : कोरोना महामारीमुळे लांबलेल्या तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्याच्या महसूल विभागाने मुदत पूर्ण झालेल्या पुणे विभागातील २२ तहसीलदारांच्या बदल्या काल केल्या. त्यात पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) अप्पर तहसीलदारांचाही समावेश आहे.

बदली झालेल्या तहसीलदारांना फक्त पाचच दिवसांत म्हणजे १७ एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, बदली रद्दसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास ती गैरवर्तणूक मानून त्याप्रकरणीही सबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे महसूल विभागाने बदली आदेशात म्हटले आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांची रजाच मंजूर केली जाणार नाही. त्यामुळे बदलीच्या विरोधात त्यांना रजेवरही जाता येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

Sanjay bala Bhegade
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आणखी एक गौप्यस्फोट; शिंदे गट आक्रमक झाल्यानंतर आता थेट तारीखच सांगितली; म्हणाले...

तीन वर्षाची मुदत काल बदली झालेल्या तहसीलदारांनी एक वर्षापूर्वीच पूर्ण केली होती. त्यामुळे त्यांच्या बदल्या होणारच होत्या. पण, कोरोना व नंतर राज्यातील सत्तापालटामुळे त्या रखडल्या होत्या. परिणामी, पिंपरी-चिंचवडसह मावळसारख्या 'क्रीम पोस्टिंग' समजल्या जाणाऱ्या या पदावरील अधिकाऱ्यांना एक वर्षाचा बोनस मिळाला होता.

मावळ (Maval) तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट चंद्रपूरला धानोरा येथे बदली केली गेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे बर्गेंविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे त्यांची शिक्षा समजल्या जाणाऱ्या ठिकाणी बदली झाल्याचा दावा मावळचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला. तर, आपली टर्म पूर्ण झाल्याने ही नियमित बदली झाल्याचे बर्गेंनी 'सरकारनामा'ला सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्य दंडाधिकारी (सेतू) या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. अर्चना विठ्ठल निकम या आल्या आहेत. तर, मावळात तहसीलदार म्हणून विक्रम देशमुख हे आले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भेगडे यांनी मावळ तहसीलदार कार्यालयात 'स्टिंग ऑपरेशन' करीत तेथे चालणारी एजंटगिरी उघडकीस आणली होती. त्यानंतर त्यांनी तहसीलदार बर्गेंना त्याबद्दल धारेवर धरले होते.

Sanjay bala Bhegade
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

सरकारी जमिनी उद्योजक आणि एजंटांच्या घशात घालण्याचं तसंच जाणीवपूर्वक राजकीय दबावापोटी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम बर्गेंनी केल्याचा आरोपही त्यांनी गेल्याचा आरोपही भेगडेंनी केला होता. त्यामुळे त्यांनी बर्गेंची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com