Devendra Fadnavis : पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांची फिल्डिंग; अनेक योजना मार्गी

Pawar and Fadnavis : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याकडे फडणवीसांचे लक्ष?
Sharad Pawar and Devendra Fadnavis
Sharad Pawar and Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल.

यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे 24 हजार 520 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे दिले.

लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक आज देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.

दरम्यान, माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. 2009 साली शरद पवार (Sharad Pawar) यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकलेही होते. त्यामुळे माढा आणि शरद पवार यांचे नाते तसे जवळचे आहे. मात्र, आता याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याकडे फडणवीस यांनी लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar and Devendra Fadnavis
Thane News : ठाण्यात शिवसेना कोणी वाढवली? : शिंदे-ठाकरे गटात रंगला जोरदार कलगीतुरा!

माढा मतदारसंघातील अनेक योजना मार्गी लावण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी फडणवीसांनी अनेक निर्णय घेतले असून नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यताही दिली आहे. त्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने विविध बाबींची पूर्तता तत्काळ करून घ्यावी. उरमोडी धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील उर्वरित त्रुटींची दुरुस्ती महिनाभरात पूर्ण करावी. शिवाय उरमोडी ते वाठार किरोली याठिकाणी बंदिस्त जलवाहिनीचे कामही हाती घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Sharad Pawar and Devendra Fadnavis
Maan : जयकुमार गोरेंचे प्रयत्न; फडणवीसांनी माण-खटावला दिला छप्पर फाडके निधी...

यामुळे माण, खटाव या दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. टेंभू योजनेची पाणी वाटप प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून माण व खटावसाठी योजना राबवावी. शिवाय सांगोला उपसा सिंचन योजनेचा आराखडा तयार करावा.

या योजनेचा प्रस्ताव 1 मार्चला देण्यात येवून प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर एप्रिलपासून काम सुरू करावे. शिवाय नीरा-देवधर प्रकल्पातील पाण्याचे फेरनियोजन करून पाणी उपलब्ध झाल्यास एक टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला देण्याच्या सूचनाही फडणवीसांनी दिल्या. यामुळे टँकरमुक्त सांगोला तालुका होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सिना-माढा उपसिंचन प्रकल्पात समावेश नसलेल्या माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, अंजनगाव या गावांचा समावेश होण्याबाबत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा. खैराव-मानेगाव उपसासिंचन योजनेत मानेगाव, धानोरे, कापसेवाडी, बुदुकवाडी, हटकरवाडी, जामगाव इत्यादी गावांना लाभ मिळण्याबाबत सुद्धा अहवाल सादर करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

Sharad Pawar and Devendra Fadnavis
State Song News : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताला का मिळाला राज्यगीताचा दर्जा? कुणी लिहिले हे गीत..

वसना उपसा सिंचन योजनेत कोरेगाव, सर्कलवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, मोरबंद आदींचा समावेश करण्याबाबत सुद्धा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या निविदा येत्या 10 दिवसात काढून काम त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कुकडी लाभक्षेत्रातील अनेक गावे पाण्याविना आहेत, त्यांना उजनी जलाशयामधून अतिरिक्त वाहून जाणार्‍या पाण्यातून पाणी देण्यासाठी नियोजन करावे. ही प्रक्रिया जलसंपदा विभागाने त्वरित हाती घ्यावी. सातारा जिल्ह्यातील काही गावांतून तब्बल 356 रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) चोरी जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत महावितरण विभागाने पोलिसांमध्ये तक्रारी द्याव्यात. पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करावी. फलटण-पंढरपूर रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता घेवून आवश्यक 50 टक्के निधीची तरतूद करावी, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Sharad Pawar and Devendra Fadnavis
Marathwada Teacher Constituency : छप्पन टेबलवर ५३ हजार मते मोजण्यासाठी सातशे अधिकारी-कर्मचारी...

मौजे रांजणी ते नीरा नरसिंगपूर येथील पुलाच्या बांधकामाबाबत सुद्धा त्यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. आतापर्यंत 287 रोहित्रे बसविण्यात आली असून 69 रोहित्रे 15 दिवसांत बसविले जातील. याशिवाय फलटण तालुक्यात तीन नवीन वीज उपकेंद्र निर्माणाधीन असून तीही लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती श्रीमती शुक्ला यांनी दिली.

यावेळी खासदार निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यासाठी जादा रोहित्रांची मागणी केली. शिवाय सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी, मोडनिंब यासह चार ठिकाणी प्रस्तावित असलेले ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com