Pimpri-Chinchwad : शरद पवारांची 'सरप्राइज व्हिजिट'; पिंपरी-चिंचवडमध्ये तिघांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
NCP News
NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडची जबाबदारी सोपविलेले शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या पहिल्याच शहर दौऱ्यात गेल्या महिन्यात १८ तारखेला पक्षात इन्कमिंग झाले. त्यानंतर १५ दिवसांत आज दुसरा प्रवेश मुंबईत झाला. त्यात यंग ब्रिगेड आहे. दर १५ दिवसांनी असे प्रवेश होणार असल्याचे आजचा प्रवेश घडवून आलेल्या एका पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'ला सांगितले.

शरद पवार हे उद्योगनगरीत अराजकीय कार्यक्रमासाठी परवा चऱ्होली, तर सोमवारी दापोडीत आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेकांच्या भेटी घेत चर्चा केली. त्याचाच परिपाक म्हणून आज हा प्रवेश मुंबईत झाल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एका तरुण चेहऱ्याची घरवापसी झाली.

NCP News
MNS on Marathi Plates : मराठी पाट्यांसाठी विदर्भात मनसेचे सध्या 'वेट अँड वॉच'; पण भविष्यात उडू शकतो भडका !

तर दोन नवे तरुण आल्याने पक्षाची ताकद वाढत चालली आहे. रोहित पवारांनी शहरात लक्ष घातल्यापासून यंग ब्रिगेड शरद पवार राष्ट्रवादीकडे आकर्षित होऊ लागली आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांचेही पाठबळ असल्याने भविष्यात आणखी युवा नेते पक्षात येणार असल्याचे पक्षाच्या एका युवा पदाधिकाऱ्य़ाने सांगितले.

अजित पवार उद्योगनगरीत आले की, त्यांच्या भोवती ठरावीक स्थानिक नेत्यांचा गराडा होता व आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांना भेटता येत नव्हते. अशी मंडळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने टार्गेट केली आहेत. त्यांचेच प्रवेश तथा घरवापसी होत आहे.

NCP News
OBC Kranti Morcha News : अजित पवारांना ओबीसी वसतिगृहाचा तिटकारा का, ‘या’ ओबीसी संघटनेचा थेट सवाल !

पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते राहिलेले काळेवाडीतील मच्छिंद्र तापकर यांचा मुलगा सागर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवारांचे एके काळचे रुपीनगर भागातील सहकारी अशोक पवार यांचे चिरंजीव उद्योजक राहुल पवार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे खजिनदार आणि स्वराज्य विश्व सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पंधरा- वीस वर्षे निगडी ओटास्कीम भागात काम करणारे ॲड. संतोष शिंदे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीत (शरद पवार गट) आपल्या तरुण समर्थकांसह प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पवारसाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून पक्षात आलेल्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, असे पाटील या वेळी म्हणाले. पक्षाचे युवा नेते आणि विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पुढाकाराने आजचे प्रवेश झाले. त्यातही सागर तापकीर यांच्या प्रवेशाने तापकीरनगर, काळेवाडीतील राजकीय समीकरण यावेळच्या पालिका निवडणुकीत बदलेल, असा अंदाज आहे.

कारण या भागात वजन असलेले त्यांचे वडील आणि माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर हेसुद्धा शरद पवार राष्ट्रवादीत भविष्यात घरवापसी करण्याची शक्यता आहे. ते आणि त्यांच्या पत्नीही नगरसेवक राहिलेल्या आहेत, तर अॅड. शिंदे यांच्या प्रवेशानंतर आणखी एक मातब्बर नेत्याचीही घरवापसी होईल, असा कयास आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी संसदेचे खास अधिवेशन सुरू असताना दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन चाचपणी केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

NCP News
Manoj Jarange Patil : मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पेटवणाऱ्या नगर जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com