Pune District MP Count : अरे बापरे! एकट्या पुणे जिल्ह्यातच 7 खासदार, राज्यातील कुठल्याच जिल्ह्याला नाही हा मान!

Eight MPs in Pune district : पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने राज्यसभा खासदारांचीही संख्याही तीन झाली आहे.
Pune District
Pune DistrictSarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha and Rajya Sabha Mps : पुणे, राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. दोन-तीन जिल्हे मिळून असणाऱ्या खासदारांची एकट्या पुणे जिल्ह्यात संख्या झाली. तेथे खासदारांची संख्या सात झाली.

पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीने राज्यसभा खासदारांचीही संख्याही तीन झाली. कारण, यापूर्वी येथे शरद पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णी हे राज्यसभा सदस्य आहेत.

Pune District
Sunetra Pawar News : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; बारामतीला मिळाला तिसरा खासदार

पुणे जिल्ह्यात पुणे शहर,मावळ,शिरुर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुती आणि आघाडीची फिफ्टी-फिफ्टी झाली. त्यांचे दोन-दोन खासदार विजयी झाले.

बारामतीत आघाडीकडून (शरद पवार राष्ट्रवादी) शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी हॅटट्रिक केली. तशीच मावळमध्ये महायुतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे यांनी ती नोंदवली. पुण्यातून महायुतीचेच (भाजप) मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेला निवडून आले. ते नगरसेवकाचे थेट खासदार झाले.

यापूर्वी ते पुण्यात नगरसेवक (महापौर) होते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.नागरी उड्डाण आणि सहकार खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले.तर, शिरुरमधून शरद पवारांचे खंदे समर्थक डॉ.अमोल कोल्हे(Amol Kolhe) पुन्हा निवडून आले.सेलिब्रिटी आणि ओघवते वक्तृत्व या जोरावर ते पुन्हा खासदार झाले.

Pune District
Rajya Sabha Election : रोहित पवारांच्या सुनेत्राकाकींना अ‍ॅडव्हान्समध्येच शुभेच्छा; म्हणाले, 'पळत्याच्या गळ्यात...'

राज्यात कुठल्याही जिल्ह्यात सात खासदार नाहीत. तो रेकॉर्ड पुणे जिल्ह्याने केला आहे. एवढेच नाही,तर या खासदारांपैकी एक मंत्रीही आहेत, हे विशेष. तसेच त्यात शरद पवार(Sharad Pawar), सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे अशा अनुभवी आणि दिग्गज खासदारांचा समावेश आहे.

कोल्हेंनी,तर पहिल्याच टर्ममध्ये आपल्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतूकही मिळवले. तेच,सुळे आणि बाऱणे हे संसदेतील कामगिरीच्या जोरावर एकदा नाही,तर अनेकदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. सुळे आणि बारणेंनी,तर महासंसदरत्न किताबही मिळवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com