Rajya Sabha Election : रोहित पवारांच्या सुनेत्राकाकींना अ‍ॅडव्हान्समध्येच शुभेच्छा; म्हणाले, 'पळत्याच्या गळ्यात...'

Rohit Pawar Taunt on Parth and Sunetra Pawar Over Rajya Sabha Nomination : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून राज्यमंत्री करावे, असा ठराव केला होता.
Rohit Pawar Sunetra pawar
Rohit Pawar Sunetra pawarsarkarnama

Pune Political News : राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज (गुरुवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) राज्यसभेच्या जागेसाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

सुरुवातीला पुण्यातून आणि नंतर बारामती मधून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अॅडव्हान्स मध्येच शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत रोहित पवारांनी Rohit Pawar एक ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले, आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.

त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय... म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!

Rohit Pawar Sunetra pawar
Aaditya Thackeray : वरळीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला! राज ठाकरेंचा ग्रीन सिग्नल?

राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज (गुरुवार) शेवटचा दिवस असल्याने आजच उमेदवाराची घोषणा होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सुनेत्रा पवार Sunetra pawar यांना राज्यसभेवरती पाठवून त्यांना राज्यमंत्री करावे असा ठराव करून तो अजित पवारांकडे पाठवला होता.

नंतर बारामती मधील काटेवाडीतून देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार वहिनींना राज्यसभेवरती पाठवा, अशी मागणी अजित पवारांकडे केली होती. त्यामुळे अजित पवार राज्यसभेच्या उमेदवारीसाठी कोणाची निवड करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी मधून विविध नावे चर्चेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

(Edited By Roshan More)

Rohit Pawar Sunetra pawar
BJP Vs MNS : 'मनसेमुळे महायुतीला काहीच फायदा नाही,आता त्यांना एकही जागा मिळणार नाही!'; भाजप आमदारानं ठणकावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com