ACP Mugutlal Patil : ...अखेर ACP मुगुटलाल पाटील यांची पोलिस आयुक्त चौबेंकडून तडकाफडकी बदली!

Pimpri-Chinchwad Police : एपीआय वसंत देवकाते यांची नियंत्रण कक्षात बदली, तर फौजदार सोहम सुरेश धोत्रेंना घरी बसवले
Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
Pimpri-Chinchwad, Commissioner of Policesarkarnama

Pimpri-Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल भानुदास पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून एक लाखाचा पहिला हफ्ता घेताना ओंकार भरत जाधव या ड्रायव्हरला परवा शनिवारी (ता.१७) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता.18) पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पाटील यांना दणका देत, त्यांची तडकाफडकी बदली साइड ब्रॅंचला अभियान येथे केली.

पोलिस आयुक्तांनी पोलिसांच्या देहूरोड विभागाला काल तिहेरी दणका दिला. या विभागाच्या एसीपींची उचलबांगडी करताना त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यावरील सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) वसंत विठ्ठल देवकाते यांचीही नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्या बदलीचे कारण, मात्र प्रशासकीय आणि जनहितार्थ असे देण्यात आले आहे. तर एका दिवसातील तिसऱ्या कारवाईत देहूरोड पोलिस ठाण्यातील फौजदार सोहम सुरेश धोत्रे यांना घरी बसवले आणि दोन पोलिसांना निलंबित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
ACB Trap in Pune : पोलिस दलात मोठी खळबळ; 'एसीपी'साठी लाखाची लाच घेणारा 'एसीबी'च्या जाळ्यात

धोत्रेंच्या हाताखाली काम करणाऱ्या दोन पोलिसांनी (पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ)आपल्या साथीदारांसह एका कॉलेज विद्यार्थ्याला गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पाच लाख रुपये नुकतेच उकळले. त्याबाबत अपहरण व खंडणीचा गुन्हा 15 तारखेला देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल झाला.

नमूद करण्याजोगी बाब तेथील एखादा अधिकारी नाही, तर स्वत: एसीपी पाटील हे त्याचा तपास करीत होते. म्हणजे तेच तपासाधिकारी (आयओ) बनले होते. त्यात आरोपी असलेले दोन पोलिस प्रथम निलंबित झाले. नंतर त्यांचे साहेब धोत्रेंवर यांच्यावर घरी बसण्याची पाळी काल आली. त्यामुळे ही तिहेरी कारवाई शहर पोलिस दलात चर्चेचा विषय ठरली.

एसीपी पाटील यांचे नाव पाच लाखाच्या लाचखोरीत येऊन त्यातील एक लाख रुपये घेताना जाधव हा पंटर पकडला गेल्याने पिंपरी-चिचंवड शहर पोलिस दलात रविवारी मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे एसीपी पाटील गोत्यात येणार असल्याचे सरकारनामाने रविवारीच दिलेल्या बातमीत म्हटले होते अखेर झालेही तसेच.

आयुक्तांनी एसीपी पाटील यांची बदली केली. कारण त्यांच्या सुचनेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागण्यात आल्याची तक्रार एका तरुणाने एसीबीकडे केली होती. त्यानुसार झालेल्या कारवाईत त्यांचे नाव आल्याने चौबे यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. पाटील यांची तडकाफडकी बदली दुय्यम शाखेत केली. त्यांच्या पदाची तात्पुरती जबाबदारी एसीपी (वाकड विभाग) डॉ. विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
Amitesh Kumar News : 'भाई-डॉन बनण्याचा नाद सोडा'; अमितेशकुमारांचा गुन्हेगारांना कडक इशारा...

दरम्यान, लाच घेणारा वाहनचालक असलेला जाधव याला पुणे येथील विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. एसीबीचे अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्यात एसीपी पाटील यांच्याविरुद्ध पुरावे आढळले, तर ते ही या लाचखोरीच्या गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेऊन डीवायएसपी नितीन जाधव हे स्वत: बारकाईने तपास करीत आहेत.

वैभवसिंग मनिषकुमारसिंग (वय 19,रा.बॉयज होस्टेल,सिंबायोसिस कॉलेज,किवळे,मूळचा झारखंड)या कॉलेज विद्यार्थ्याला त्याचा मित्र तसेच स्थानिक देहूरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील (डीबी) वरील दोन कर्मचारी गायकवाड आणि् शेजाळ यांनी आपल्या साथीदारांसह 10 तारखेला पळवून नेले. त्याला पोलिस ठाण्यावर आणले. गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवली. ते नको असेल, तर 20 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 4 लाख 98 हजार रुपये त्यांनी गूगल पे आणि नेट बँकिगद्वारे उकळले.

Pimpri-Chinchwad, Commissioner of Police
Pune Crime News : पोलिस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

या गुन्ह्यात देहूरोड पोलिस ठाण्याच्या डीबीचे प्रमुख असलेले पीएसआय धोत्रे यांचे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवून त्यांना पोलिस आयुक्तांनी निलंबित केले. दरम्यान, या खोट्या केसनंतर देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या जुगार अ़ड्यांवर गुन्हे शाखेने (युनीट चार) कारवाई केली. त्यामुळेही धोत्रेंच्या सस्पेंशनला आणखी एक कारण आणि बळ मिळाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com