Indurikar Maharaj News: तृप्ती देसाईंनी इंदूरीकर महाराजांना अक्षरश: झापलं; तुमच्या पोटात का दुखतयं..

इंदुरीकर महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान नृत्यांगना गौतमी पाटीलवर टीका केली होती
Indurikar Maharaj | Ganutami patil
Indurikar Maharaj | Ganutami patilSarkarnama
Published on
Updated on

Indurikar Maharaj vs Trupti Desai : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी एका किर्तनादरम्यान नृत्यांगना गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर भाष्य केलं आहे. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख आणि आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही किर्तनाला पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडल्याचा आरोप होतो. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे कीर्तनात ते बोलत होते.

त्यानंतर इंदुरीकर आणि गौतमी पाटील प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडनेदेखील उडी घेतली आहे.सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांच्या आगपाखड करत त्यांचा समाचार घेतला आहे. आता गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? असा प्रश्न देसाई यांनी विचारला आहे.

Indurikar Maharaj | Ganutami patil
Nana Patole News : शिवधनुष्य यात्रा आणि राज ठाकरेंना भेटल्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांना भेटावे !

इतकेच नव्हे तर, एखादी महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केली. असे मत तृप्ती देसाईंनी व्यक्त केले आहे. तसेच इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो, असा खडा सवाल देसाईंनी इंदुरीकरांना केला आहे.

दोन दिवसांपूर्वी इंदुरीकर यांनी कीर्तन करताना " तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही किर्तनाला पाच हजार मागितले तर पैशाची बाजार मांडलाय असा आरोप होतो, अशा शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमीचं नाव न घेता तिच्यावर टिका केली होती. गौतमीच्या गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही, असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर निशाणा साधला.

Indurikar Maharaj | Ganutami patil
Karnataka CM Badavraj Bommai : राजकारणी पण गोल्फचे शौकिन : बसवराज बोम्मई

गेल्या काही महिन्यांपासून नृत्यांगना गौतमी पाटील राज्यभरात चर्चेत आहे.सुरुवातील अनेकांनी गौतमी पाटीलचा विरोध देखील केला. पण अलीकडच्या काळात तिच्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमू लागली आहे.या कार्यक्रमांमध्ये अनेकदा गोंधळ, हाणामारी पर्यंतचे प्रकार घडतात. त्यावरुनही गौतमीवर टिका होत असते.यात कीर्तनकार इंदुरीकर यांनीही तिच्यावर टिका केली. पण त्यांनी केलेली ही टिका त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com