Pune News : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषस्थळी जेव्हा पोलिसांकडून लाठीमार झाला, तेव्हा जालन्याचे पोलिस अधीक्षक असलेले तुषार दोशी यांची आता बदली झाली आहे. त्यांना आता गुन्हे विभाग अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अंतरवाली सराटी येथील लाठीमाराच्या घटनेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं होतं, यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवरही धरलं होते. त्यावेळी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांची गुन्हे विभाग अधीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे.
तुषार दोशी यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसह नेत्यांकडून करण्यात आली होती; परंतु आता त्यांची बदली झाल्याने पुन्हा एकदा वाद उदभवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
२००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. चंद्रपूरमधील राजुरा हा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता. यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले आहे.
तुषार दोशी हे पुणे पोलिस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलिस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणामुळे चर्चेत होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.