Pune MVA : पुण्यातील आठ जागांसाठी महाविकास आघाडीत 'टशन'! कुणाचं काय म्हणणं?

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole : महाविकास आघाडीतील पुण्यातील काही स्थानिक नेत्यांनी दावा केलेल्या विधानसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम असल्यचाे स्पष्ट केले आहे.
Pune MVA
Pune MVASarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच महाविकास आघाडीत पुण्यातील आठ जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी काही जागांवर दावा केला आहे. आता त्या जागांवरून काही केले तरी आमचाच पक्ष लढणार असल्याची भूमिका घेतली आहे.

पुण्यात ठाकरे गटाचा काही दिवसांपूर्वी संकल्प मेळावा पार पडला. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी तयारीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी पुणे शहरात शिवसेनेचे मोठे प्रस्थ होते. आता पक्षाचे ते गतवैभव परत आणायचे आहे, असे आवाहनही ठाकरेंनी केले आहे. तर खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील कोथरूड, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या चार जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात शिवसेना ठाकरे गटाची मजबूत स्थिती आहे. यापूर्वी पुण्याने शिवसेनेला अनेक आमदार दिलेले आहेत. येथील कोथरूड, हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला येथे आपला पक्ष मजबूत असल्याचे राऊतांनी सांगितले. राऊत यांचा हा धागा पकडत अंधारे यांनी, पक्षाने कोणत्याही परिस्थितीत चार जागा लढवाव्यात असा आग्रह कार्यकर्त्यांचा असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसच्या Congress स्थानिक नेत्यांनी शहरातील किमान तीन जागा लढवण्याचा वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. त्यात पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच कोथरूड, पर्वती आणि हडपसर या जागाही आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे पहायला मिळते.

Pune MVA
Supreme Court On ED : विरोधकांची कोंडी करणाऱ्या 'ईडी'ला 'सर्वोच्च' फटकारे! न्यायालयाचे खडे बोल; नेमकं काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या Sharad Pawar नेत्यांनीही शहरातील चार जागांवर दावा केलेला आहे. त्यात हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला आणि पर्वती या मतदारसंघाचा समावेश आहे. शहरात वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर खडकवासला येथे कमी फरकाने राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आघाडीत जागा खेचण्यासाठी शरद पवार गटही मागे नसल्याचे पाहायला मिळते.

पुण्यातील स्थानिक नेत्यांनी दावा ठोकलेल्या जागा लढण्यावर ठाम असल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चर्चा आहे. यावर वरीष्ठ पातळीवर काय तोडगा काढला जातो, आणि कोणता मतदारसंघ कोणाला मिळाणार, याची पुणेकरांना उत्सुकता आहे.

Pune MVA
Kolhapur BJP : पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षाने राज्य सरकारकडे केली मोठी मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com