Pimpri-Chinchwad : पिंपरी महापालिकेवर नामुष्की; एका दिवसांत दोन कर्मचारी निलंबित

Pune News : दोन दिवस पोलीस कोठडी झाल्याने पिंपरी पालिकेचे दोन कर्मचारी झाले निलंबित
Pimpri Chinchwad News Pcmc
Pimpri Chinchwad News PcmcSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना प्रशासक तथा आयुक्त शेखरसिंह यांनी एकाच दिवशी काल (ता.२४) निलंबित केले. यामुळे पालिकेची मोठी नामुष्की झाली आहे.

प्रशासक राजवटीतील कारभार बेशिस्त झाल्याचा या कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे. कारण हे दोन्ही कर्मचारी गंभीर फौजदारी गुन्ह्यांत पकडले गेले. त्यात त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी झाली. त्यामुळे त्यांच्यावर निलंनबाची कारवाई केली गेली. त्यात पहिला (सचिन आनंदा डोळस) सफाई कामगार, तर दुसरा (दिलीप भावसिंग आडे) हा पाणीपुरवठा विभागातील अनुरेखक आहे.

Pimpri Chinchwad News Pcmc
Rahul Gandhi : पत्रकारांचा तीनदा एकच प्रश्न; राहुल गांधी थेटच बोलले...

दरम्यान, प्रशासकीय राजवटीत पालिकेतील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी तो वाढल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईतून स्पष्ट झाले आहे. वर्षभराच्या प्रशासकीय कारभारात पालिकेत एसीबीची दोनदा धाड पडली. पहिल्यांदा ही कारवाई करसंकलन विभागात झाली. तर, नुकतीच (ता.२३) ती पाणीपुरवठा विभागात होऊन एक लाख रुपयांची लाच घेताना आडे पकडला गेला.

मात्र, यापूर्वी लाचखोरीत पकडले गेलेले पालिका कर्मचारी व अधिकारी हे सहा महिन्यांनंतर पुन्हा पालिका सेवेत निलंबनानंतर रुजू झाले आहेत. त्यामुळे लाचेच्या कारवाईचा धसका तेवढा गांभीर्याने घेतला जात नसून त्यातून पालिकेतच नाही, तर इतरत्रही लाचखोरी वाढतच चालली आहे. त्यामुळे लाचखोरीत पकडल्यानंतर सबंधित सरकारी कर्मचारी वा अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी होऊ लागली आहे. अशा लाचखोरांना बडतर्फच करावे, असा सूर आहे.

Pimpri Chinchwad News Pcmc
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा अजितदादांना टोला; अधिवेशनादरम्यान त्यांचा नवीन गुण पाहायाला मिळाला

लाचखोरीच्या गुन्ह्यात २३ मार्चला अटक झालेल्या आडेला ४८ तास पोलीस कोठडीत रहावे लागल्याने त्याचे निलंबन केले गेले. तर,डोळसवरही कारवाई त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी फसवणुकीच्या गुन्ह्यात या महिन्यातच (ता.७) झाली.

वायसीएम रुग्णालयात सफाई कामगार असलेल्या आडेला तळेगाव दाभाडे पोलिसांनी पकडले. या दोन्ही प्रकरणांचा अहवाल पोलिसांनी दिल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली. मात्र, तीन महिने या दोघांना अर्धा पगार काम न करता घरी बसून आता मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यास अशोभनीय असे गुन्हेगाारी स्वरुपाचे गंभीर गैरवर्तन केल्याने पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका या दोघांवर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com