Rahul Gandhi : पत्रकारांचा तीनदा एकच प्रश्न; राहुल गांधी थेटच बोलले...

Press conference Rahul Gandhi : ''राहुल गांधी पत्रकारांवरच भडकले, नेमकं काय घडलं?''
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२४ मार्च) त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.

मात्र, याच दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधी चांगलेच भडकले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर आरोप करत तुम्ही स्वतःला पत्रकार का म्हणवता? असा प्रश्न विचारला.

Rahul Gandhi
Devendra Fadnavis : शिंदेंच्या आमदाराला फडणवीसांचा दणका; विधानपरिषदेत केली मोठी घोषणा

यावेळी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, कोर्टाच्या निर्णय आल्यानंतर तुम्ही ओबीसींचा अपमान केल्याचा प्रचार तुमच्याविरोधात सुरू आहे, यावर तुमची भूमिका काय आहे?, असा प्रश्न विचारताच राहुल गांधी चांगलेच भडकले.

यावर बोलताना राहुल गांधी भडकले, ''आत्ताच पत्रकारांनी तीन वेळा हा प्रश्न विचारला. तुम्ही इतकं थेटपणे भाजपसाठी का काम करता? जर तुम्हाला भाजपच काम करायचं असेल तर तसा भाजपचा बॅच छातीवर लावून फिरा. तेव्हाही मी तुम्हाला आत्ता ज्या प्रकारे उत्तर दिलं त्याच प्रकारे उत्तर देईन. पण आम्ही पत्रकार आहोत असं दाखवू नका'', असं ते म्हणाले.

Rahul Gandhi
Ravi Shankar Prasad : देशात प्रत्येकासाठी एकच कायदा मग तुमच्यासाठी...; राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

त्यानंतर पुन्हा राहुल गांधी म्हणाले की, काय झालं? सगळी हवा निघाली?, असं म्हणत त्यांनी पत्रकारांवर टीका केली. दरम्यान, राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२४ मार्च) त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com