Uday Samant : 'दादांनी उमेदवार पळवला' आरोपावर उदय सामंतांचं 'खणखणीत उत्तर': म्हणाले,'उमेदवार पळवला, म्हणून...'

Uday Samant Responds to ‘Candidate Poaching’ Allegations : ‘दादांनी उमेदवार पळवला’ या आरोपांवर उदय सामंतांनी दिलेलं खणखणीत उत्तर. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींचा संपूर्ण तपशील जाणून घ्या.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Pune : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांचे माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपमध्ये मंगळवारी भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठली. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर भाजपाने शिवसेनेमध्ये तूर्तास युद्धविराम झाल्याचं बोललं जात आहे. असलं तरी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांमधली खदखद मात्र अद्यापही सुरूच असल्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

महायुतीमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींबाबत पुण्यामध्ये बोलताना उदय सामंत म्हणाले, एनडीएमध्ये एकनाथ शिंदे हे तीन नंबरचे नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर जेव्हा भेटतात तेव्हा ते एनडीएचे प्रमुख नेते म्हणून भेटत असतात. त्यामुळे ते तक्रार करण्यासाठी भेटले हे म्हणणं चुकीचं असून शिंदे हे तक्रार करणारे नेते नसून हे सोलुशन काढणारे नेते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका दिल्ली मधून स्पष्ट केली असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

महायुती मधील प्रमुख तीन पक्षातील वरिष्ठांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला बॉण्ड खूप मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणीही मिठाचा खडा टाकायला जाऊ नये त्यांच्यामध्ये वाद लागणार नाही. शिंदे यांनी यापूर्वीच आपल्या पक्षातील नेत्यांना सांगितला आहे. भाजपमधून शिवसेनेत कोणताही नेत्यांना प्रवेश द्यायचे नाहीत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षांना सूचना दिल्यास शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश होणार नाहीत.

Uday Samant
Nitish Kumar Net Worth : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री, तरीही...; संपत्ती पाहून तुम्हाला बसेल धक्का; किती जमीन, दागिने?

युतीमध्ये आमची जी काही नाराजी होती. ती आम्ही दोनच व्यक्तींकडे मांडू शकतो एक म्हणजे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि दुसरे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस त्यामुळे त्याच पद्धतीने आमची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवली असून त्यातून मार्ग निघाला आहे.

भोरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा असलेला उमेदवारच राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेने मधील संघर्ष उफाळला आहे त्याबाबत उदय सामंत म्हणाले, पाळवा पाळवीच्या राजकारणाला जनता उत्तर देईल

Uday Samant
TET Exam Rules : शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी, टीईटी परीक्षा केंद्रांवर आता 'हाय-टेक' सुरक्षा!; काय आहे नवीन नियमावली?

राष्ट्रवादी काँग्रेसने कुठेतरी काहीतरी केले म्हणून आम्ही नाराज होणार नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये खेळत असतो आणि सतर्क देखील असतो त्यामुळे कोणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणून आमचा पक्ष संपत नाही. आम्ही संघर्षातून मोठे झालेला आहोत त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींची आम्हाला विचार करायची गरज नाही असं उदय सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com