Pimpri Chinchwad Politics : राहुल कलाटे आता तुम्ही आमदार होणार का? वाघेरेंच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

Sanjog Waghere To Join Uddhav Thackeray Shiv Sena Questions On Rahul Kalate : राहुल कलाटेंचे काय होणार? सर्वत्र एकच चर्चा...
Rahul Kalate, Sanjog Waghere
Rahul Kalate, Sanjog Waghere Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Latest News : अजित पवार यांचे कट्टर समर्थक, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील हे येत्या शनिवारी (ता.३०) ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्योगनगरीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या वाघेरेंच्या (संजोग) शिवसेनेतील एन्ट्रीमुळे त्या वाघेरेंच्या (संदीप) युतीच्या (ठाकरे शिवसेना) मावळातील लोकसभा उमेदवारीवर फुली मारली गेली आहे.

दरम्यान, लोकसभाच नाही तर, त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही संजोग वाघेरेंच्या शिवसेना प्रवेशाचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे चिंचवडमधून आमदार होण्याच्या राहुल कलाटेंच्या आशा आता मावळल्यात जमा आहेत. त्यामुळे कलाटे आता तुम्ही आमदार होणार का? अशी चर्चा चिंचवडच नाही तर, उद्योगनगरीत सुरू झाली आहे. कारण आता वाघेरे ठाकरेंच्या शिवसेनेत आल्याने चिंचवडमधून आमदार होण्याच्या कलाटेच्या मार्गात मोठा अडथळा आला आहे.

Rahul Kalate, Sanjog Waghere
Pimpri-Chinchwad: अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; कट्टर समर्थक संजोग वाघेरे शिवबंधन बांधणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते असलेल्या कलाटेंनी यावर्षीच्या फेब्रुवारीतील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोरी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे त्यावेळी त्यांच्याशी चर्चेला तयार होते. तरी त्यांनी त्यांचे ऐकले नाही. बंड केले. तिथेच त्यांच्या आमदार होण्यास प्रथम करकचून ब्रेक लागला. कारण त्यांचा तर पराभव झाला. उलट त्यांच्या या बंडखोरीमुळे आघाडीचे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आमदार नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांचा तोंडाशी आलेला विजय हिरावला गेला आणि युतीच्या (भाजप) अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्यानंतर त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. सध्या ते कुठल्याही राजकीय पक्षात नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेची पिंपरी-चिंचवडमधील धुरा ही वाघेरेंकडे येणार आहे. त्यांच्या ठाकरे गटातील एन्ट्रीमुळे कलाटेंचे मित्र आणि भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचे आघाडीकडून (ठाकरे शिवसेना) मावळात लोकसभेच्या उमेदवारीवर जसे पाणी फिरले, तसेच ते कलाटेंच्या आमदार होण्याच्या मनसुब्यावरही फिरण्याची शक्यता आहे. त्यांची आमदारकीची वाट खूपच बिकट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दारे बंद झाल्याने आता भाजपशिवाय त्यांना पर्याय नाही.

Edited by Sachin Fulpagare

Rahul Kalate, Sanjog Waghere
Pune DPDC News : 800 कोटींची कामे कशी मंजूर केली? भाजप-शिंदे गटाचा अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com