Pune DPDC News : 800 कोटींची कामे कशी मंजूर केली? भाजप-शिंदे गटाचा अजित पवारांविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा...

Ajit Pawar News : अजित पवारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना भाजप-शिंदे गटातील नेत्यांचे निवेदन.
Pune DPDC News |
Pune DPDC News | Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता नव्या वादाचे फटाके फुटण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या सरकारमध्ये महायुतीत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित सत्तेत आहेत. मात्र नियोजन समितीत नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांवर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा आक्षेप आहे. यामुळे आता जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाला भाजप आणि शिवसेनेकडूनच विरोध होताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Pune DPDC News |
MLA Sunil Shelke : भाजप मंत्र्याला चितपट करणारे आमदार सुनील शेळके...

जिल्हा नियोजन समितीचे इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. ही 800 कोटींची कामे रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार, असा इशारा भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवारांना दिला आहे. यामुळे नियोजन समितीच्या कारणावरुन आता अजित पवार गट एकटा पडल्याचे दिसत आहे. यामुळे आता अजित पवारांपुढे मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीतील सदस्यांनीच पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर आक्षेप घेतले आहे. सदस्यांकडून एक निवदेन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे. भाजप आणि शिंदे गटातील जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांनी हा आक्षेप घेतला आहे. 800 कोटींच्या कामाचे इतिवृत्त भाजप आणि शिंदे गटातल्या सदस्यांना देण्यात आले नव्हते, असा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे.

Pune DPDC News |
Pune News : शिवतारे,आढळरावांना शिंदे गटाकडून मिळाले पहिले गिफ्ट;जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असते. यामध्ये विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला जातो. या बैठकीचे इतिवृत्त नसताना परस्पर 800 कोटींची कामे कसे मंजूर होतात? भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे सत्तेतल्या तिन्ही पक्षातील धुसफूस आता समोर येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com