Shiv Sena UBT news : पक्ष-चिन्हाच्या निकालाआधीच ठाकरेंना जोरदार झटका; कोर्टात लढणाऱ्या वकिलाची सनद रद्द

Uddhav Thackeray Faces Legal Blow Before Party Symbol Verdict : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही सनद रद्द केली आहे. विधानसभा आणि राज्यपालांविरुद्ध केलेले विधान भोवले असल्याचं सांगितलं जात आहे.
"Uddhav Thackeray faces a major legal setback as lawyer Asim Sarode’s license is revoked just before the Shiv Sena party symbol verdict."
"Uddhav Thackeray faces a major legal setback as lawyer Asim Sarode’s license is revoked just before the Shiv Sena party symbol verdict."Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह प्रकरणाची सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

उध्दव ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. सरोदे यांच्यासह ठाकरेंसाठीही हा धक्का मानला जात आहे. सरोदे यांनी तत्कालीन राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या विधानामुळे त्यांची सनद रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेच्या 40 आमदारांसह केलेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर राज्यातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एवढंच नव्हे तर, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही विधानसभा अध्यक्षांसह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले. या नावावर आणि मशाल चिन्हावरच ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.

"Uddhav Thackeray faces a major legal setback as lawyer Asim Sarode’s license is revoked just before the Shiv Sena party symbol verdict."
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंचा आयुक्तांच्या अधिकारांबाबत धडाकेबाज निर्णय; ‘हे’ पाऊल मोठा बदल घडविणार... 

त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरु असून आता या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी शेवटचा आशेचा किरण आहे. मात्र अशातच ठाकरेंसाठी एक चिंतेची बाबा समोर आली आहे.

"Uddhav Thackeray faces a major legal setback as lawyer Asim Sarode’s license is revoked just before the Shiv Sena party symbol verdict."
Sheikh Hasina News : शेख हसीना यांच्या पाठीत कुणी खुपसला खंजीर? खळबळजनक माहिती उघडकीस, PM मोदींबाबतही मोठा दावा...

सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजू लावून धरणारे असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द असणार आहे. राज्यातील सत्ता नाट्यानंतर सरोदे यांच्याकडून सातत्याने ठाकरेंची बाजू मांडली जात आहे. यादरम्यान त्यांनी तत्कालीन राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरुध्दही भाष्य केले होते. न्यायालयाच्या निकालावरही त्यांनी विधाने केली होती. याप्रकरणीच सरोदे यांच्यावर कौन्सिलने ठपका ठेवत तीन महिन्यांसाठी सनद रद्द केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com