Pune News : पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे सदस्य आणि तीन टर्म नगरसेवक राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, उज्ज्वल केसकर यांनी यंदाची विधानसभा लढण्याचा चंग बांधला आहे. 'आपल्याला भाजपकडून शिवाजीनगर अथवा कोथरूडमधून उमेदवारी द्यावी,' अशी मागणी केसकर यांनी भाजपतील वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. 'माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. वेळ पडल्यास अपक्ष देखील निवडणूक लढू,' असा इशारा केसकर यांनी दिला आहे.
गेल्या काही काळापासून भाजपतील ( Bjp ) मुख्य प्रवाहापासून उज्ज्वल केसरकर हे दूर राहिल्याचं पाहायला मिळतं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं केसकर यांनी बंड करून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, केसकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2012 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक देखील केसकर यांनी 'पुणे जनहित आघाडी' नावाचा पक्ष स्थापन करून लढवली होती. त्यामाध्यमातून त्यांनी कोथरूड परिसरात उमेदवार उभे केले होते. तेव्हाही, केसकर यांना अपेक्षित यश मिळालं नाही. नंतर 2014 मध्ये केसकर यांना पुन्हा भाजपत घेण्यात आलं. पण, पुणे भाजपत ते सक्रिय नव्हते.
आता केसकर यांनी शिवाजीनगर अथवा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे, खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांना आपल्याला उमेदवारी द्यावी, अशा मागणीचे पत्र केसकर यांनी पाठवलं आहे.
याबद्दल उज्ज्वल केसकर म्हणाले, "पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून अनेक वादग्रस्त निर्णय झाले. त्याबाबत मी आणि अनेक सहकारी मित्रांनी सनदशीर मार्गानं आवाज उठवला आहे. प्रत्येकवेळी न्यायालयात जाऊन दाद मागणे हे लोकशाही परंपरेला शोभत नाहीत."
"पौडा फाटा रोड, नांदेड सिटी येथी नागरिकांवर लावण्यात आलेला जिझिया कर, शनिवार वाड्याभोवती शंभर मीटर ना विकास विभागविरुद्ध लढा दिला. 'युडीसीपीआर'मुळे शहराचं अस्तित्त्व नष्ट होऊन शहर बकाल होईल, या भीतीनं सर्व पातळीवर लढा दिला. न्यायालयात याचिका देखील केल्या.
23 गावांचा बनवलेला विकास आराखडा बेकादेशीर आहे. तो रद्द करण्यासाठी लढाई सुरू आहे. ससूनच्या समोरची जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याच्या प्रयत्नाला देखील पहिल्यांदा मी विरोध केला. अशा अनेक प्रश्नांबद्दल लोकप्रतिनिधी नसताना देखील कार्यरत आहे," असं केसरकर यांनी सांगितलं.
"मंत्री चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या निधीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे लागतात ही शोकांतिका आहे. नागरिकांना लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवा आहे, असे मला वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीची भूमिका ही महत्त्वाची असते. ती निभवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे मला वाटते आहे. एक कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा माझा विचार आहे," असं केसकर यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.