Supriya Sule : विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार दुर्देवी....सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule म्हणाल्या, ''जो विरोधात बोलतो speaks against त्याच्यावर कुठली न कुठली धाड टाकली जाते व त्याची तपशीलवार आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे.
MP Supriya Sule
MP Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

दौंड : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेली झाडाझडती हा विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार आहे. विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार दुर्देवी आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली न कुठली धाड टाकली जाते व त्याची तपशीलवार आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. परंतु सत्ताधारी ज्यांच्यावर भ्रष्टाचार किंवा अन्य आरोप करतात त्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या पक्षात जातात तेव्हा हेच आरोप विरघळून जातात.''

MP Supriya Sule
प्रेषित पैगंबर अवमान प्रकरण; तेलंगणाचे आमदार टी. राजा भाजपमधून निलंबित

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची एक देश - एक पक्ष, ही भूमिका दडपशाहीची आहे. आम्ही मात्र राज्यघटनाप्रेमी असून आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे.'' सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई करण्यात आली. परंतु आज दोन महिन्यानंतरही पुणे जिल्ह्यासाठी पालकमंत्री नियुक्त करण्यात न आल्याने शिक्षण, आरोग्य, आदी सर्वसामान्यांशी निगडित कामांविषयीचे निर्णय रखडले आहेत.''

MP Supriya Sule
उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता, पण राज्य सरकार...

निर्मला सीतारमण यांचे जंगी स्वागत केले पाहिजे....

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती मतदारसंघाचा दौरा करणार असतील तर आपण सगळ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले पाहिजे. दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील विकासकामांसाठी बारामतीचा दौरा केला होता. बारामती सर्वांना हवी असते. या मतदारसंघात काहीतरी विशेष आहे ,म्हणूनच लक्ष घातले जात असेल, अशी टिप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com