शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार! आठवलेंनी टाकला बॉम्ब

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
Ramdas Athawale and Sharad Pawar
Ramdas Athawale and Sharad Pawar Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा बॉम्ब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी टाकला आहे. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा ऑफर दिली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊ दिले नसते. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर यावे. त्यासाठी अजून वेळ गेलेली, असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या घरी हल्ला होण्याची माहिती पोलिसांना नव्हती का? असा प्रश्न आठवलेंनी उपस्थित केला. या हल्ल्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करुन आठवले म्हणाले की, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनांचा विचार करुन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला आहे. त्यातूनच हा हल्ला झाला असला तरी अशा प्रकारचा हल्ला योग्य नाही. हल्ल्यात सहभागी असलेल्या कामगारांना कामावर न घेण्याची भूमिकाही चुकीची आहे.

Ramdas Athawale and Sharad Pawar
सलग दुसऱ्या सोमवारी पोलिसांनी चौकशी केली अन् दरेकर म्हणाले, माझा छळवाद मांडलाय!

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना आठवलेंनी ही ऑफर दिली आहे. त्यांच्या या ऑफरची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मशिदीवरील भोंग्याबाबत मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेशी मी सहमत नाही. विरोधाला विरोध करणे योग्य नाही. राज ठाकरे नव्हे तर उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारसदार आहेत. ते पुन्हा आमच्याबरोबर येण्याचा निर्णय बदलत नाहीत याबद्दल वाईट वाटतं. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विचार बदलून आमच्यासोबत सत्तेत यावे.

Ramdas Athawale and Sharad Pawar
राज ठाकरेंची भेट होताच वसंत मोरे म्हणाले, सगळ्या ऑफर संपल्या!

रामनवनी ही पवित्र मानली जाते. त्यामुळे त्यादिवशी मांसाहार न खाण्याची भूमिका योग्य आहे. परंतु, याला हिंसक पद्धतीने विरोध करणे चुकीचे आहे. त्यामुळे हल्ल्याच्या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, असे आठवलेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com