Uttarakhand Tunnel Disaster : त्या मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढवली...

Congress demands a judicial inquiry on tunnel disaster :उत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
Uttarakhand Tunnel Rescue Operation
Uttarakhand Tunnel Rescue OperationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उत्तराखंड टनेलमधील खोदकाम करणाऱ्या 41 कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातून’ सुटका झाल्याचे सर्व देशाने पाहिले. त्याबद्दल 17 दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले. मात्र, हा प्रकार नक्की का घडला. या मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढविली याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

उत्तराखंड टनेल दुर्घटनेवर आता राजकारण सुरू झाले आहे. टनेलचे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरिंग कंपनीवर’ सरकार काय कारवाई करणार, असा सवाल तिवारी यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uttarakhand Tunnel Rescue Operation
ED Officer Bribe Case : ईडीच्या अधिकाऱ्याने मागितली तब्बल 3 कोटींची लाच; पुढे काय घडलं ?

या कंपनीला हे काम देताना त्यांची तांत्रिक क्षमता, अनुभव पाहिले गेले का? मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनांची आखणी करणे या कंपनीस गरजेचे का वाटले नाही? नैसर्गिक व पर्यावरणाचे नियम व संकेत तुडवले गेले काय? असे अनेक प्रश्न यानिमित्त समोर येत असून, मजुरांच्या जिवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या या कंपनीवर सरकार काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करून या दुर्घटनेची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार हे जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित कंपनीची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये मोरवी पुलाची दुर्घटना घडली होती. मात्र, यातील दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही तिवारी म्हणाले.

Uttarakhand Tunnel Rescue Operation
Washim News : ‘युवा संघर्ष’च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नवचैतन्याची लहर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com